गृहराज्यमंत्री मिश्रांनी राजीनामा द्यायला हवा

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेचे व्हिडिओही समोर आलेत. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची हत्या झाली. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता.
गृहराज्यमंत्री मिश्रांनी राजीनामा द्यायला हवा Minister of State for Home Affairs Mishra Should resign
गृहराज्यमंत्री मिश्रांनी राजीनामा द्यायला हवा Minister of State for Home Affairs Mishra Should resign

मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेचे व्हिडिओही समोर आलेत. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची हत्या झाली. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. उत्तर प्रदेश सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी पदावरून दूर व्हायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकार  सीबीआय, प्राप्तिकर विभाग, ईडी, एनसीबी या यंत्रणांचा वापर राजकीय हेतून करीत आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आज कुठेही दिसत नाही. देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच -पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून त्यांनी विक्रमच  केला.’’  मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्या वेळी मावळवासीयांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्या काळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरे केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे, हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 

 गुजरातमध्ये तीन हप्त्यांत एफआरपी काही लोकांनी उसाला वन टाइम एफआरपी दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. पण वस्तुस्थितीही पाहिली पाहिजे. गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यांत पैसे दिले जातात. कारखान्यांनी कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे जरी दिले तर ते कर्ज कसे फेडणार. कारखाने कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढू शकतो. कारखाने बंद करायला फारशी अक्कल लागत नाही, पण सुरू करायला लागते, असा टोलाही पवार यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com