Agriculture News in Marathi Minister of State for Home Affairs Mishra Should resign | Page 2 ||| Agrowon

गृहराज्यमंत्री मिश्रांनी राजीनामा द्यायला हवा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेचे व्हिडिओही समोर आलेत. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची हत्या झाली. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता.

मुंबई : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेचे व्हिडिओही समोर आलेत. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची हत्या झाली. असा प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता. उत्तर प्रदेश सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी पदावरून दूर व्हायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘केंद्र सरकार  सीबीआय, प्राप्तिकर विभाग, ईडी, एनसीबी या यंत्रणांचा वापर राजकीय हेतून करीत आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आज कुठेही दिसत नाही. देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा छापा पडल्याचे कळले. पाच -पाच वेळेला एका व्यक्तीच्या घरी छापा टाकून त्यांनी विक्रमच  केला.’’

 मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्या वेळी मावळवासीयांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्या काळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरे केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे, हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 

 गुजरातमध्ये तीन हप्त्यांत एफआरपी
काही लोकांनी उसाला वन टाइम एफआरपी दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. पण वस्तुस्थितीही पाहिली पाहिजे. गुजरातमध्ये ऊस उत्पादकांना तीन हप्त्यांत पैसे दिले जातात. कारखान्यांनी कर्ज काढून शेतकऱ्यांना पैसे जरी दिले तर ते कर्ज कसे फेडणार. कारखाने कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढू शकतो. कारखाने बंद करायला फारशी अक्कल लागत नाही, पण सुरू करायला लागते, असा टोलाही पवार यांनी लगावला.


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनोत्तर...रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब...औरंगाबाद : ‘‘एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा...
नाशिक : मॉन्सूनोत्तर शेतकऱ्यांवर मोठे... नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील...
नळपाणी योजनांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतसांगली ः जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा...
परभणी जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’पासून सहा...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत भाग...नांदेड : ‘‘रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा,...
मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या...नांदेड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्युमुखी...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
साडेपाच लाख टन सोयापेंड  आयातीसाठी...पुणे ः केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम...
तुरीच्या पिकाकडून तूट भरून निघण्याची आशासाखरखेर्डा, जि. बुलडाणा ः यंदा या परिसरात तुरीचे...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...