Agriculture news in Marathi Minister Thakur's letter to the Chief Minister regarding farmers' questions | Agrowon

शेतकरीप्रश्‍नांबाबत मंत्री ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

मुंबई : ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असताना शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा पुरविण्यासह कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती देणे आवश्यक असल्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई : ‘कोरोना’ प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असताना शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा पुरविण्यासह कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती देणे आवश्यक असल्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे व रोहयो, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना पत्र पाठवून शेतकरीपूरक धोरण राबविण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सद्य:स्थितीमध्ये राज्यामध्ये संचारबंदी असून ३ मे २०२० पर्यंत लागू राहणार आहे. साहजिकच याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून त्यामध्ये कृषी क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी खरीप हंगामाचे नियोजन करीत असताना सर्व शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, कीटकनाशके आदी आवश्यक गोष्टींचा पुरवठा शासनामार्फत अनुदानित किमतीवर पुरविण्याची हमी देणे आवश्यक आहे. तसेच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची प्रलंबित कर्जमाफी तात्काळ करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. यामध्ये दोन लाख रुपयांवरील कर्जाचे शेतकरी बांधवांबाबत सकारात्मक धोरण अंतिम करणे आवश्यक आहे. तसेच कृषी पतपुरवठा योग्यरित्या करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मंत्री ठाकूर यांनी केली आहे.

‘मनरेगा’मधून प्रायोगिक तत्वावर शेतीकामे करा
आगामी पेरणी हंगाम लक्षात घेता शेतीची पूर्व मशागत, पेरणी पूर्व, मध्य हंगाम आणि कापणी व इतर मजुरीचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अकुशल भागामधून प्रचलित यंत्रणेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर करण्याबाबत राज्यामध्ये निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

पत्रात केलेल्या मागण्या

  • शेतकरी पूरक योजना प्राधान्याने राबवाव्या
  • पाणलोट व यांत्रिकीकरण योजनांना तात्पुरती स्थगिती द्यावी
  • कृषी निविष्ठा अनुदानित तत्त्वांवर शेतकऱ्यांना देण्यात याव्या

इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...