खरेदी केंद्रात तुरीची किरकोळ आवक

सिंचनाची सुविधा असल्याने हेक्‍टरी १० क्विंटल तूर उत्पादन मिळाले. परंतु शासकीय केंद्रात हेक्‍टरी चार क्विंटल ५० किलोच तुरीची खरेदी केली. बाजारात दर कमी असल्याने मला नुकसान सहन करावे लागले. - आतिष पाटील, शेतकरी, गाळण (ता. पाचोरा, जि. जळगाव)
खरेदी केंद्रात तुरीची किरकोळ आवक
खरेदी केंद्रात तुरीची किरकोळ आवक

जळगाव : जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रात तुरीची किरकोळ आवक झाली. हेक्‍टरी फक्त चार क्विंटल ७० किलो खरेदीच्या निकषामुळे फटका बसत असल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला.  

मागील हंगामात हेक्‍टरी १० क्विंटलपर्यंतची खरेदी शासकीय केंद्रात झाली होती. या हंगामात मात्र उत्पादनातील घट, दुष्काळ व पीक कापणी प्रयोग अहवाल, याची कारणे पुढे करून फक्त चार क्विंटल ७० किलो तुरीची खरेदी केली जात आहे. यातही बारदान्यात ५० किलो तूर भरण्याची क्षमता असते. निकषानुसार चार क्विंटल ७० किलो तूर बारदान्यातून केंद्रात आणली, तर ५० किलोनी भरलेली पाच पोती घेतली जातात. उर्वरित २० किलो तूर घेतली जात नाही. ५० किलोचाच बारदाना घेण्याचे सांगून अडवणूकही होत असल्याची माहिती मिळाली. 

जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथील तूर खरेदी केंद्र सुरवातीला सुरू झाले. जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर व चाळीसगाव येथेही तूर खरेदी सुरू केली. परंतु जळगाव केंद्रात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. फक्त आठ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. त्यांना मोबाईलवर संदेश पाठविले. यातील एकाही शेतकऱ्याने तूर केंद्रात विक्रीसाठी आणली नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, इतर केंद्रातही रोज प्रत्येकी ४० ते ४२ क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे. अशातच बाजारात तूर दरांवर दबाव वाढत आहे. दर प्रतिक्विंटल ४८०० ते ५००० रुपयांपर्यंतच आहेत. अर्थातच हमीभावापेक्षा ८०० ते १००० रुपये दर कमी मिळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांमध्ये आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com