नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या लघुचित्रपटाला पुरस्कार

नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या लघुचित्रपटाला पुरस्कार
नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या लघुचित्रपटाला पुरस्कार

नाशिक  : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित ''जागतिक पर्यावरण दिन – २०१९''च्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आले होते. या वेळी ''वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा २०१८''मध्ये हौशी गटात प्रथम आल्याबद्दल पर्यावरणमंत्री रामदास कदम व आदित्य ठाकरे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश देऊन नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित पर्यावरणविषयक वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धा २०१८ या स्पर्धेत नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या "Lifeline Meets Life" या लघुचित्रपटास हौशी गटात प्रथम क्रमांक मिळाला. महानिर्मितीचे संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे व नाशिक औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाप्रसंगी पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुधीर श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते. 

पर्यावरणपूरक उपक्रमात नाशिक वीज केंद्र आघाडीवर  वीज केंद्राच्या परिसरात प्लॅस्टिक मुक्त वीज केंद्र, कचऱ्यापासून खतनिर्मिती, मियावाकी वृक्ष लागवड, पीस पार्क सुशोभीकरण, ओनरशीप संकल्पनेनुसार बाग-बगीचे, हरितपट्टा विकास, पाणी बचत-पुनर्वापर, अर्थ अवर, ऊर्जा बचत, सिड बॉल, वृक्षारोपण व संवर्धन अशा अभिनव व पथदर्शी योजनांचा समावेश आहे. यामुळेच एकलहरे वसाहत नैसर्गिकदृष्ट्या संपन्न झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com