धरणांमधील जलसाठ्यात किरकोळ वाढ

धरणांमधील जलसाठ्यात किरकोळ वाढ
धरणांमधील जलसाठ्यात किरकोळ वाढ

जळगाव ः जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील मध्यम प्रकल्प कोरडेच आहे, तर गिरणा व वाघूर या धरणांच्या साठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. रावेर तालुक्‍यातील मंगरूळ व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, तापी नदीवरील मुक्ताईनगर नजीकच्या हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे शुक्रवारी (ता. १७) उघडण्यात आले.

हतनूरमधून दोन लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरणात ३०.३४ टक्के जलसाठा आहे. तर वाघूर नदीवरील जामनेर व जळगाव नजीकच्या वाघूर धरणाचा साठाही फारसा वाढलेला नाही. तो ३६.३६ टक्के एवढाच आहे. चोपडा व धुळे जिल्ह्यातील शिरपूरनजीकच्या अनेर धरणाचा साठाही फारसा वाढलेला नसून, तो १८ टक्केच आहे. तर जळगाव जिल्ह्यातील बहुळा (पाचोरा), मन्याड (चाळीसगाव), अग्नावती, भोकरबारी, अंजनी हे पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच आहेत.

धुळ्यात हलका व मध्यम पाऊस धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भागातील प्रकल्प, तलाव अजूनही कोरडेच आहेत. दुष्काळाचे संकट या भागावर कायम असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या जिल्ह्यातील अमरावती, पांझरा प्रकल्पाच्या साठ्यातही फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही.

अनेक भागांत अतिवृष्टी शुक्रवारी (ता. १७) सकाळी आठपर्यंत गिरणा भवनकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात २४ तासांत अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. त्यात रावेरात ६८ मिलिमीटर, चाळीसगावात ६६, रावेरात १२२, जामनेरात १२५, जळगावात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. चोपडा, पाचोरा येथेही बऱ्यापैकी पाऊस झाला. अमळनेरातही ६८ मिलिमीटर पाऊस झाला. चोपडा तालुक्‍यातील अनेर प्रकल्पाच्या क्षेत्रात फक्त २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पारोळा, एरंडोल, धरणगाव, भडगाव येथेही ७२ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यावल येथेही अतिवृष्टी झाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com