महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
ताज्या घडामोडी
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळच
उंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने पूर्ण होत आले, तरी देखील बारामती तालुक्याच्या जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे या भागातील लोकांना ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून शिरसाई उपसा योजनेचे पाणीही देखील लाभार्थी गावात मृगजळ ठरु लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
उंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने पूर्ण होत आले, तरी देखील बारामती तालुक्याच्या जिरायती भागात अद्यापही दमदार पाऊस नाही. त्यामुळे या भागातील लोकांना ऐन पावसाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून शिरसाई उपसा योजनेचे पाणीही देखील लाभार्थी गावात मृगजळ ठरु लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
बारामती तालुक्याच्या जिरायती भागात गेली तीन- चार वर्षे कमी प्रमाणात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे यावर्षी मोठ्या दुष्काळाला या भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदा जून, जुलै आणि ऑगस्टचा पंधरावडा झाला तरी देखील दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात टॅंकर सुरुच आहेत. अशा स्थितीत बारामतीच्या जिरायती भागाल वरदान ठरु पाहत असलेल्या शिरसाईचे पाणी देखील मृगजळ ठरु लागले आहे.
कारखेल, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, साबळेवाडी, खराडेवाडी, अंजनगाव, जळगाव सुपे, साबळेवाडी, शिर्सुफळ, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर, जराडवाडी ही गावे शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येतात. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य शिरसाईच्या पाण्यावर अवलंबून असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या ढीसाळ नियोजनामुळे ही योजना संपूर्ण आवर्तन पूर्ण न करताच पाच दिवसातचं बंद पडली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रिमझिम पावसावर आलेली खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी अंतिम घटका मोजत नाही. त्यामुळे शिरसाई उपसा योजनेचे पाणी तातडीने सोडावे, अशी मागणी लाभार्थी गावातून होत आहे.
कार्यक्षेत्रात कार्यालय हवे
शिरसाई उपसा सिंचन योजनेत लाभार्थी गावे बारामती तालुक्यातील आहेत. मात्र या योजनेचे कार्यालय दौंड तालुक्यातील पाटस येथे आहे. यामुळे शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयक नसल्याने पाणीपट्टी अथवा पाण्याची मागणी करणे शेतकऱ्यांना जिकीरीचे होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना पाणीपट्टी व पाणी मागणीचा अर्ज घेवून गेल्यानंतर अधिकारी कार्यक्षेत्रात असल्याचे सांगितले जाते. यामुळे शेतकऱ्यांना मोकार हेलपाटे मारण्याची वेळ येते. त्यामुळे या योजनेचे कार्यालय शिरसाईच्या लाभार्थी गावात व्हावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- 1 of 583
- ››