agriculture news in marathi, misleading to grapes producers, nashik, maharashtra | Page 3 ||| Agrowon

द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पंचमाने सुरू असताना काही ठिकाणी कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामे केल्यास निर्यातक्षम द्राक्ष नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो तसेच संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता आदेश आले, आता सरसकट पंचनामे सुरू आहेत. 
- तुकाराम पिंगळे, द्राक्ष बागायतदार, मातोरी, जि. नाशिक

नाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास आपली बाग ‘ग्रेपनेट’साठी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी चुकीची माहिती काही कृषी कर्मचाऱ्यांकडून पुरवली जात असल्याने बागायतदारांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर मात्र, हा प्रकार बंद करण्यात आला, असला तरी शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 
जिल्ह्यातील पूर्वहंगामी द्राक्ष हंगाम संपूर्णपणे बाधित झाला आहे. तर नियमित द्राक्षबागांचेही संपूर्ण जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. 

अशा परिस्थितीत कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू आहेत. मात्र ‘जर नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे झाले, तर ग्रेपनेट प्रणालीअंतर्गत द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणारे निर्यातक्षम द्राक्ष प्रमाणपत्र मिळणार नाही,’ असे कृषी विभागाच्या पंचनामे करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमार्फत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना सांगण्यात येत होते. आशा प्रकारे चुकीची माहिती देण्याचा प्रकार काही ठिकाणी उघडकीस आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर द्राक्षबागांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

निर्यातक्षम द्राक्षबागांची निर्यातक्षम नोंदणीमध्ये तपासणी व निर्यातीस शिफारसकामी युरोपीय देशांना द्राक्ष निर्यात करण्याकरिता बागांची नोंदणी आवश्‍यक असते. मात्र, पंचनाम्यादरम्यान संभ्रमता निर्माण झाली होती. दिंडोरी व नाशिक तालुक्यांत कृषी विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती देत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला असे प्रकार समजल्यानंतर याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे. द्राक्ष बागांच्या सरसकट पंचनाम्यांचे करून त्यांचा अहवाल सादर करण्यात यावे अशा सूचना करण्यात आले आहेत. 

द्राक्ष बागांचे बाबतीत नुकसान झाले असल्यास, त्याप्रमाणे पंचनामे करण्यात यावेत त्यासाठी कोणाचाही पंचनामा थांबवू नये. नुकसानीचे पंचनामे व निर्यातक्षम द्राक्ष नोंदणी हे दोन वेगवेगळे विषय असून त्यात संभ्रम निर्माण करू नये, अशा सूचना कृषी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत...
मुंबई बाजार समितीत सीताफळ, डाळिंबाची...मुंबई: सध्याच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील...
संत्रा पट्ट्यात रेल्वेचे शेतकरी माहिती...नागपूर: संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेचा स्वस्त आणि...
हा तर विश्वासघात!खरे तर जून ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर थोडे...
एका शोकांतिकेचे पुनरावर्तनदेशात एप्रिलपासून उन्हाळ कांद्याचा आवक हंगाम सुरू...
`अॅक्शन प्लॅन’ करेल काम!  मागील महिनाभरापासून विदर्भातील संत्रा उत्पादक...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे  ः पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या...
मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार सरी पुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढला...
हजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय`...अकोला ः राज्यात काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगने...
पीक, मध्य मुदतीच्या कर्ज हप्त्यांना ...नाशिक: २०१९-२० च्या द्राक्ष हंगामामध्ये सप्टेंबर...
कृषी विद्यापीठांमधील निवृत्ती निकषाचा...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
खरीप कांदा लागवडीसाठी तारेवरची कसरत  नाशिक: जिल्ह्यात खरीप कांदा लागवडीसाठी...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेने रोडमॅप तयार...नागपूर: संत्रा वाहतुकीसाठी रस्त्याचा एकमेव पर्याय...
सोलापूर दूध संघाकडून दरात साडेतीन रुपये...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कांद्यावर निर्यातबंदीनाशिक : कांदा दरात सुधारणा होताच केंद्र सरकारने...
खानदेश, पश्‍चिम विदर्भात कापसाचे ३५ लाख...जळगाव : खानदेशात मे अखेरीस लागवड केलेल्या कापूस...
शेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...
प्रत्यक्ष पाऊस कमी, आकडेवारीच मोठी !बुलडाणा ः तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला...
मुगाच्या हमी दराने खरेदीकडे दुर्लक्षनगर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान हमी दराने...