अकोलखेडमधील पाऊस नोंदी दिशाभूल करणाऱ्या

अकोलखेड महसूल मंडळात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही स्कायमेट वेदरने चुकीची आकडेवारी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार या भागातील संत्रा उत्पादकांनी केली आहे.
Misleading rain records in Akolkhed
Misleading rain records in Akolkhed

अकोला ः जिल्ह्यातील अकोलखेड महसूल मंडळात जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असतानाही स्कायमेट वेदरने चुकीची आकडेवारी दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याची तक्रार या भागातील संत्रा उत्पादकांनी केली आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा तसेच आमदार नितीन देशमुख यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठवले. याबाबत निवेदनात म्हटले, की अकोलखेड महसूल मंडळातील या वर्षी संत्रा पिकाच्या मृग बहराचा फळपीक विमा एचडीएफसी या कंपनीकडे काढला आहे. 

भारत सरकारच्या राजपत्रामध्ये १५ जून ते १५ जुलै या काळात १२५ मिलिमीटर पाऊस न झाल्यास हेक्टरी ४० हजार रुपये क्लेम लागू राहील, असे सांगितले आहे. मात्र या महसूल मंडळामध्ये सदर कालावधीत पेरणीलायकसुद्धा पाऊस झाला नाही. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण संत्रा बागांना कमी पावसामुळे मृग बहर धरलाच नाही. परंतु कंपनीच्या स्कायमेट वेदर स्टेशनच्या अहवालात १२८ मिलिमीटर पाऊस दाखवून शेतकऱ्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. याचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालकमंत्री, कृषिमंत्री यांनाही निवेदन पाठविण्यात आले. धनराज धर्मे, विठ्ठल लाहोदे, नारायण वनकर, दिनेश ताडे, नितीन लटकुटे, शांतीराम वरणकार, सागर भालतिलक, मो. साजीद, प्रभाकर भालतिलक, गोपाल लटकुटे आदींनी हे निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com