agriculture news in marathi 'Mission Begin Again' is aimed at restarting our lives again.: CM Uddhav Thackeray | Agrowon

राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ : बाधितक्षेत्र वगळता अन्य झोन नाहीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जून 2020

येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात होत आहे.

मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लाँकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाउन’चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात होत आहे. केंद्र सरकारने धार्मिक स्थळे आणि इतरकाही गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्याने मात्र तूर्तास ते बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘अनलॉकिंग’च्या प्रक्रियेला ‘मिशन बिगीन अगेन’ असे म्हणण्यात आले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या. त्यामध्ये बाधितक्षेत्र (कंटेनमेंट झोन वगळता) मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका,  पुणे,  सोलापूर,  औरंगाबाद,  मालेगाव,  नाशिक,  धुळे,  जळगाव,  अकोला आणि अमरावती या महापालिका क्षेत्रात बाधितक्षेत्र वगळता काही सवलती दिल्या आहेत.

यामधे तीन टप्पे करण्यत आले असून तीन विविध टप्यात सवलती अधिकअधिक वाढवत नेल्या आहेत. मागील टप्यात दिलेल्या सवलती या टप्यात कायम आहेत.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येत्या ३ जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरू करण्यात येणार आहे.

लॉकडाउनचे राज्यातील टप्पे

 • पहिला  - २५ मार्च ते १४ एप्रिल
 • दुसरा - १५ एप्रिल ते ३ मे
 • तिसरा - ४ मे ते १७ मे
 • चौथा - १८ मे ते ३१ मे
 • पाचवा (‘मिशन बिगीन अगेन’) - १ जून ते ३० जून 

राज्य सरकारच्या सूचना
पहिला टप्पा (तीन जूनपासून लागू)

 • सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांची मैदाने, बागा अशा ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. सामूहिकपणे कोणतीच कृती करता येणार नाही. लहान मुलांसोबल एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल.
 • प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल.
 • गॅरेज सुरू करता येतील. पणत्यासाठी पूर्वनियोजित वेळ घेणे गरजेचे.
 • अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.

दुसरा टप्पा (पाच जूनपासून)

 • सर्व दुकाने सुरू करण्यास ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी पी१ आणि पी२ असा नियम असेल. म्हणजेच रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर, दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. दुकानांची वेळ केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ एवढीच असेल.
 • कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करण्याची परवानगी नसेल.
 • लोकांनी दुकानांत किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
 • एखाद्या बाजारात सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, तो बाजार तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
 • टॅक्सी, कॅब, रिक्षा आणि दुचाकी यांना केवळ अत्यावश्यक कामासाटी परवानगी. मात्र त्यासाठी चालक अधिक दोन प्रवासी असे बंधन असेल. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

तिसरा टप्पा (आठ जूनपासून)

 • खासगी कार्यालयांना परवानगी असेल. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ दहा टक्केच कर्मचारी असावेत. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक.

महत्त्वाचे

 • ६५ वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुलांनी अत्यावश्यक कामासाठी अथवा वैद्यकीय कारणाव्यतरिक्त घराबाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
 • रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी कायम असेल. अत्यावश्यक सेवांना त्यातून सूट असेल.
 • जिल्हांतर्गत बस सेवा ५० टक्के क्षमतेसह सुरू करता येईल.
 • आंतरजिल्हा बस सेवेला परवानगी नाही

हे बंदच राहणार

 • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास
 • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक
 • मेट्रो
 • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, एन्टरटेनमेंट पार्क, बार, सभागृहे,
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि मोठे समारंभ
 • सर्व धार्मिक स्थळे
 • केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर
 • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटी सेवा

(टप्प्याटप्प्याने व सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करून या गोष्टी सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे) 
 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...