मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील जनुकीय निवड पद्धतीचा अवलंब

दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते.
Study targets reducing methane production by 20 percent in 10 years
Study targets reducing methane production by 20 percent in 10 years

दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते. दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते. ते कमी करण्यासाठी स्पेन येथील संशोधकांनी खाद्यांचे अत्यंत कार्यक्षमपणे विनियोग करणाऱ्या व तुलनेने कमी मिथेन उत्सर्जित करणाऱ्या दुधाळ गाईंची पैदास करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या निवड पद्धतीच्या पैदास कार्यक्रमातून दुधाचे उत्पादनही वाढण्यास मदत होईल, असा दावा ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’ या संशोधनपत्रिकेतील लेखामध्ये करण्यात आला आहे.   रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या पचनसंस्थेमध्ये होणाऱ्या प्रक्रियेतून मिथेन हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हा जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असून, त्यामुळे या पशूंच्या खाद्य पचनासाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. त्याविषयी माहिती देताना माद्रिद (स्पेन) येथील राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान आणि पूरक संशोधन संस्थेतील प्राणी पैदास विभागातील संशोधक ऑस्कर गोन्झालेझ- रेसियो यांनी सांगितले, की सध्या एकूण दुधाळ गायीपासून तयार होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रत्येक गाईंची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यात येत असून, त्यातून प्रती किलो दुधामागे मिथेनची तीव्रता कमी केली जात आहे. मात्र, पैदास कार्यक्रमामध्ये मिथेन उत्सर्जनामध्ये घट करण्याचे ध्येय ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.  या मुद्द्यावर सुरू आहे संशोधन

  • गायींची निवड करताना त्यांचे जनुकीय गुणधर्म, आर्थिक फायदेशीरपणा यांचे विश्लेषण केले गेले पाहिजे. या अभ्यासामध्ये १५०१ गायींचे सुमारे ४५४० जनुकीय नोंदी व निकष तपासण्यात आले. 
  • या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्पॅनिश संशोधन, विकास आणि नावीन्यता नियोजन २०१३ ते २०२० या आर्थिक निधीतून मदत करण्यात आली.
  • पचनसंस्था योग्य प्रकारे कार्यरत राहण्यासाठी मिथेन तयार होणे आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पुढील १० वर्षामध्ये ४ ते ६ टक्के या प्रमाणात मिथेन उत्सर्जन कमी करताना प्रती गाय दूध उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे. -जर प्रती वर्ष गायीपासून होणारे मिथेन उत्सर्जन हे गायींच्या पैदास कार्यक्रमामध्ये अंतर्भूत केले तर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये येत्या १० वर्षामध्ये २० टक्क्याने घट होऊ शकते. मात्र, जर आपल्याला मिथेनच्या निर्मितीतील जैविक मर्यादांची नेमकी माहिती नसेल, तर पशुपालकांना निवड करण्यासाठी फायदेशीर, तरी पर्यावरणासाठी अधिक पूरक असे पर्याय देता येणार नाहीत.
  • प्रती गाय उत्पादन वाढल्यास प्रती अब्ज किलो दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक गायींची संख्या कमी ठेवता येईल. त्याचा फायदा हरितगृह वायूंच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी होऊ शकतो. मात्र, हे पुरेसे नाही. जर आपण वेळीच उपाययोजना केली नाही, तरी जनुकीय गुणधर्मांमध्ये मिथेन उत्सर्जनाचे गुणधर्म वाढत जाण्याचा धोका नाकारता येत नाही.  - डॉ. ऑस्कर गोन्झालेझ - रेसियो

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com