Agriculture news in marathi Mitigation of greenhouse gases in dairy cattle through genetic selection | Agrowon

मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील जनुकीय निवड पद्धतीचा अवलंब

वृत्तसेवा
सोमवार, 27 जुलै 2020

दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते.
 

दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते.

दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या उत्सर्जनाची समस्या जागतिक तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनापैकी सुमारे १३ टक्के उत्सर्जन पशुपालनातून होते. ते कमी करण्यासाठी स्पेन येथील संशोधकांनी खाद्यांचे अत्यंत कार्यक्षमपणे विनियोग करणाऱ्या व तुलनेने कमी मिथेन उत्सर्जित करणाऱ्या दुधाळ गाईंची पैदास करण्याचे नियोजन सुरू केले आहे. या निवड पद्धतीच्या पैदास कार्यक्रमातून दुधाचे उत्पादनही वाढण्यास मदत होईल, असा दावा ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’ या संशोधनपत्रिकेतील लेखामध्ये करण्यात आला आहे.  

रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या पचनसंस्थेमध्ये होणाऱ्या प्रक्रियेतून मिथेन हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. हा जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असून, त्यामुळे या पशूंच्या खाद्य पचनासाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. त्याविषयी माहिती देताना माद्रिद (स्पेन) येथील राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान आणि पूरक संशोधन संस्थेतील प्राणी पैदास विभागातील संशोधक ऑस्कर गोन्झालेझ- रेसियो यांनी सांगितले, की सध्या एकूण दुधाळ गायीपासून तयार होणाऱ्या मिथेन उत्सर्जनाकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. प्रत्येक गाईंची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यात येत असून, त्यातून प्रती किलो दुधामागे मिथेनची तीव्रता कमी केली जात आहे. मात्र, पैदास कार्यक्रमामध्ये मिथेन उत्सर्जनामध्ये घट करण्याचे ध्येय ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

या मुद्द्यावर सुरू आहे संशोधन

  • गायींची निवड करताना त्यांचे जनुकीय गुणधर्म, आर्थिक फायदेशीरपणा यांचे विश्लेषण केले गेले पाहिजे. या अभ्यासामध्ये १५०१ गायींचे सुमारे ४५४० जनुकीय नोंदी व निकष तपासण्यात आले. 
  • या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्पॅनिश संशोधन, विकास आणि नावीन्यता नियोजन २०१३ ते २०२० या आर्थिक निधीतून मदत करण्यात आली.
  • पचनसंस्था योग्य प्रकारे कार्यरत राहण्यासाठी मिथेन तयार होणे आवश्यक असले तरी त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पुढील १० वर्षामध्ये ४ ते ६ टक्के या प्रमाणात मिथेन उत्सर्जन कमी करताना प्रती गाय दूध उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे. -जर प्रती वर्ष गायीपासून होणारे मिथेन उत्सर्जन हे गायींच्या पैदास कार्यक्रमामध्ये अंतर्भूत केले तर हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये येत्या १० वर्षामध्ये २० टक्क्याने घट होऊ शकते. मात्र, जर आपल्याला मिथेनच्या निर्मितीतील जैविक मर्यादांची नेमकी माहिती नसेल, तर पशुपालकांना निवड करण्यासाठी फायदेशीर, तरी पर्यावरणासाठी अधिक पूरक असे पर्याय देता येणार नाहीत.

प्रती गाय उत्पादन वाढल्यास प्रती अब्ज किलो दुधाच्या उत्पादनासाठी आवश्यक गायींची संख्या कमी ठेवता येईल. त्याचा फायदा हरितगृह वायूंच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी होऊ शकतो. मात्र, हे पुरेसे नाही. जर आपण वेळीच उपाययोजना केली नाही, तरी जनुकीय गुणधर्मांमध्ये मिथेन उत्सर्जनाचे गुणधर्म वाढत जाण्याचा धोका नाकारता येत नाही. 
- डॉ. ऑस्कर गोन्झालेझ - रेसियो


इतर कृषी शिक्षण
कोडोली येथे कंपोस्ट खत निर्मिती...कोडोली (जि .सातारा) ः ग्रामीण कृषी कार्यानुभव...
कृषीकन्येने भरविले रानभाज्याचे प्रदर्शनरानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने...
गावी परतलेल्यांसाठी आधार ठरेल मनरेगाग्रामीण भागातील लोकांना काम मिळण्याचा हक्क अबाधित...
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोगबीड येथील सौ.के.एस.के.(काकू) कृषि महाविद्यालयात...
कृषी विद्यार्थी पोहोचविताहेत नवे तंत्रपुसेगाव (जि.सातारा) ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर...
कृषीकन्या सांगताहेत जमीन सुपिकतेचे फायदेमाळेगाव (जि.पुणे ) ः बारामती कृषी महाविद्यालयातील...
मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी गाईतील...दुधासाठी गोपालनातून होणाऱ्या मिथेनच्या...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
मध्यपूर्व प्रदेशातील पावसात ४० टक्के घटविविध प्रारूपाद्वारे मध्यपूर्वेतील पावसाच्या...
सूक्ष्म अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया...मोलाब्द हे सूक्ष्म अन्नद्रव्य कडधान्य पिकामध्ये...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कृषी पदवीच्या परीक्षांचा कृती आराखडा...अकोला/नाशिक ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पीक कर्जावरील व्याज आकारणीवेळेत परतफेड करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना वर्षाकाठी ३...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
पीक अवस्थेनुसार जाणून घ्या तापमानमहाराष्ट्र राज्य हे भौगोलिक क्षेत्रानुसार देशात...