भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद 

शेतकरी, कामगार कायदे तसेच वाढत्या महागाई विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात येथे दुचाकी रॅली काढण्यात आली.
भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद  Mixed response in India Bandla Akola
भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद  Mixed response in India Bandla Akola

अकोला : शेतकरी, कामगार कायदे तसेच वाढत्या महागाई विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अकोल्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात येथे दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.  जनतेला आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या राजवटीत शेतकरी विरोधी तीन कायदे आणल्याने आर्थिक स्थिती ढासळली आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बादीचा घाट घातला आहे. या सरकारच्या धोरणाविरोधात देशातील शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी सोमवारी (ता.२७) भारत बंदचे आवाहन केले होते. यात काँग्रेसनेही पाठिंबा देत सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काहींनी प्रतिसादही दिला. रॅली संपताच अनेकांनी नंतर दुकाने उघडून व्यवहार सुरू केले. या बंदला काँग्रेस, आम आदमी पक्षासह इतर संघटनांनीही पाठिंबा दिला होता. 

बाजार समितीत शुकशुकाट  बंदच्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंदमुळे बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहल्याने शुकशुकाट पसरलेला होता. सध्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली असून मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमालाची आवक वाढू लागली होती. अशातच बंद ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com