नाशिक जिल्ह्यात शंका निरसनासाठी मतदार यंत्रांची सरमिसळ

 नाशिक जिल्ह्यात शंका निरसनासाठी मतदार यंत्रांची सरमिसळ
 नाशिक जिल्ह्यात शंका निरसनासाठी मतदार यंत्रांची सरमिसळ

  नाशिक : देशात सातत्याने एकाच पक्षाच्या होणाऱ्या विजयामुळे निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर राजकीय पक्ष व मतदारांकडून घेण्यात येत असलेल्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आयोगाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याकरिता मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जनतेच्या मनात यंत्राबाबत शंका दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष  बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पाडली.  

या वेळी पक्ष प्रतिनिधींनी विचारलेल्या शंकांचे निरसन करून त्यांना सरमिसळची पद्धतीही समजावूनही सांगण्यात आली. देशाच्या विविध भागांतून नाशिक जिल्ह्यासाठी ही यंत्रे आणण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्रे ठेवण्यात वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली असून,  यापूर्वीच या यंत्राची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. आता कोणत्या विधानसभा मतदारसंघासाठी कोणते यंत्र पाठवायचे त्याची निवड सरमिसळ पद्धतीने करायची,  जेणेकरून कोणालाही शंका राहू नये. यासाठी मांढरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व व्हीव्हीपॅट यंत्राबाबतच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना असलेल्या सर्व शंकांचे निरसन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा २० टक्के जादा मतदान यंत्र संबंधित मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहेत. संगणकीय प्रणालीच्या साह्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी कशारितीने पूर्ण होईल, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना माहिती दिली.

सदर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले, की सरमिसळ प्रक्रियेंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. सदर व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. तसेच, मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्याचेही,  त्यांनी प्रत्यक्ष हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

सरिता नरके यांनी संगणकीय प्रणालीद्वारे प्रथम व द्वितीय सरमिसळ प्रक्रिया कशापद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे,  याची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघनिहाय ४७२० मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५१३ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६९ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले.  या वेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नोडल अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजश्री अहिरराव, प्रशांत पाटील, नायब तहसीलदार अमित पवार यांच्यासमवेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com