लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात कामाची लगीनघाई

पहाटेचा गारठा काहीसा झाला कमी
पहाटेचा गारठा काहीसा झाला कमी

मुंबई: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ‘काउंटडाउन’ सुरू झाल्याने मंत्रालयात कामे मार्गी लावण्यासाठी लगीनघाई दिसत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी निर्णयांना ब्रेक लागणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात नागरिकांची गर्दी वाढली होती. मतदारसंघातील सार्वजनिक हिताची कामे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, निधी उपब्लध करून घेणे, प्रकल्प-योजना मंजूर करून घेणे यासाठी खासदार-आमदारांची लगबग पाहायला मिळाली. भारतीय निवडणूक आयोगाकडून सतराव्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागते. आचारसंहितेत सरकारला, एखाद्या विभागाला मतदारांवर प्रभाव पाडू शकेल, असा कोणताही निर्णय घेता येत नाही. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येत नाहीत. निर्णय घेण्यावर पूर्णपणे बंधने येतात. त्यामुळे गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळल्यापासून अनेक मंत्री मंत्रालयात ठाण मांडून होते. आचारसंहितेत एखादा महत्त्वाचा निर्णय अडकून राहू नये म्हणून मंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयांवर बैठका घेणे, फाईल निकालात काढणे, प्रकरणांच्या सुनावणी घेणे यांवर भर देत असल्याचे दिसून आले. शनिवार आणि रविवारी सरकारी सुटी असल्याने मंत्र्यांनी शुक्रवारचा दिवस मार्गी लावला. आचारसंहितेपूर्वी कामाचा निपटारा व्हावा म्हणून राज्याच्या अनेक भागांतील लोक आपापली निवेदने घेऊन मंत्रालयात आले होते. त्यामुळे विभागाचे सचिव, सहसचिव, उपसचिव यांच्या दालनात नेहमीपेक्षा जास्त गर्दी उसळली होती. विविध प्रकारचे अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी शाळा, आश्रमशाळांच्या संस्थाचालकांनी वित्त विभागात तर महापालिका, नगरपालिका क्षेत्राशी संबंधित कामासाठी नगरविकास खात्यात आणि विविध परवानग्या तसेच सुनावणीशी संबंधित कामासाठी महसूल विभागात लोकांचा राबता वाढला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com