विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार बबनराव शिंदे

सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी वामन उबाळे यांची निवड करण्यात आली.
MLA Babanrao Shinde as the President of Vitthalrao Shinde Factory
MLA Babanrao Shinde as the President of Vitthalrao Shinde Factory

सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांची पुनश्च निवड  करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी वामन उबाळे यांची निवड करण्यात आली.

कारखानच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, रमेश येवले - पाटील, सुरेश बागल, प्रभाकर कुटे उपस्थित होते.

जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांपैकी एक विठ्ठलराव शिंदे कारखाना गणला जातो. कारखान्याचे १६ हजार सभासद आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाची सलग चौथ्यांदा निवडणूक बिनविरोध झाली आहे.

नूतन २१ संचालकांची कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. यात ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी निवडीनंतर अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. 

कारखाना कर्जमुक्त करणार

शिंदे म्हणाले, ‘‘कारखाना कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे. केंद्र सरकार इथेनॉलबाबत चांगले धोरण राबवत आहे. साखरेविषयीचे धोरण चुकीचे आहे.  यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येत आहे. चालू गळीत हंगामात ११.२० टक्के साखर उतारा मिळाला आहे. एफआरपीनुसार २ हजार ३७५ रुपये ऊसदर देण्यात येणार आहे. ३० जानेवारीपर्यंत  आलेल्या उसाला २ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंतच्या उसाला आठ दिवसांत पहिली उचल मिळेल. तसेच पोळा व दिवाळी सणाला  असे दोन हप्ते देण्यात येतील. सर्व ऊस  गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com