agriculture news in marathi MLA Babanrao Shinde as the President of Vitthalrao Shinde Factory | Agrowon

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार बबनराव शिंदे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांची पुनश्च निवड  करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी वामन उबाळे यांची निवड करण्यात आली.

सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांची पुनश्च निवड  करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी वामन उबाळे यांची निवड करण्यात आली.

कारखानच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. 
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, रमेश येवले - पाटील, सुरेश बागल, प्रभाकर कुटे उपस्थित होते.

जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांपैकी एक विठ्ठलराव शिंदे कारखाना गणला जातो. कारखान्याचे १६ हजार सभासद आहेत. कारखान्याच्या संचालक मंडळाची सलग चौथ्यांदा निवडणूक बिनविरोध झाली आहे.

नूतन २१ संचालकांची कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. यात ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी निवडीनंतर अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. 

कारखाना कर्जमुक्त करणार

शिंदे म्हणाले, ‘‘कारखाना कर्जमुक्त करण्याचे धोरण आहे. केंद्र सरकार इथेनॉलबाबत चांगले धोरण राबवत आहे. साखरेविषयीचे धोरण चुकीचे आहे. 
यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येत आहे. चालू गळीत हंगामात ११.२० टक्के साखर उतारा मिळाला आहे. एफआरपीनुसार २ हजार ३७५ रुपये ऊसदर देण्यात येणार आहे. ३० जानेवारीपर्यंत 
आलेल्या उसाला २ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे. तर १५ फेब्रुवारीपर्यंतच्या उसाला आठ दिवसांत पहिली उचल मिळेल. तसेच पोळा व दिवाळी सणाला 
असे दोन हप्ते देण्यात येतील. सर्व ऊस 
गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.’’


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...