कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं टाळकं फोडू : आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना वऱ्हाडी दिलासा

आमदार बच्चू कडू यांची आता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे नजर वळली आहे. कडु यांनी नाशिक जिल्ह्यातील फसवूक झालेल्या कांदा उत्पादकांकडून प्रश्न समजून घेत जिल्हाभर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.
सरकारनामा ब्युरो
सरकारनामा ब्युरो

येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे, मग घाबराले काय झालं..... शेतक-याचे पैसे व्यापारी पण लुटून राहिले ना भाऊ.... त्यांच्या टाळक्यात प्रहार करायला मागपुढं कामुन पहायचं... घाबरायचं नाही.... बच्चु कडू आहे तुमच्या सोबत.... असं सांगत आमदार बच्चू कडू यांनी आपल्या खास व-हाडी स्टाईलमध्ये येवल्याच्या शेतक-यांचे आंदोलन आपल्या हाती घेतले. त्यामुळे या शेतक-यांना धीर मिळाला.  आतापर्यंत निराधार, निराश्रीत, दिव्यांग आदींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायदा हातात घेऊन चर्चेत राहिलेल्या आमदार बच्चू कडू यांची आता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे नजर वळली आहे. कडु यांनी नाशिक जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या कांदा उत्पादकांकडून प्रश्न समजून घेत जिल्हाभर मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.    वैजापूर येथील शहीद जवान किरण थोरात यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आमदार कडू आले होते. यावेळी येवला येथील व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. "तुमचे कष्टाचे पैसे ना बे, मग घाबराले काय झालं ? शेतकऱ्यांना सर्वेच लुटून राहिले. आता तर व्यापारी पण पैसे बुडूवून राहिले ना भाऊ, मग त्यांच्या टाळक्‍यात प्रहार करायला माग पुढं कामुन पहायचं?... तुमच्या सोबत बच्चू कडू आहे ना बे...पण आधी तुह्या अधिकाराची तर जाणीव करून घेशील ना,".... अशा खास वऱ्हाडी स्टाईलमध्ये आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. 

त्यांनी येवल्यातील शेतकऱ्यांना पैशांसाठी लढण्याचा सल्ला दिला. या वेळी कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देऊ. ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न व्यापारी करत आहेत त्यांना धडा शिकवू, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले. येथील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची यादीच यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीभाऊ महाजन, उपाध्यक्ष वसंत झांबरे यांनी आमदार कडू यांना दिली. 

येवल्यातील व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे मागील आठवड्यात बेमुदत उपोषणास बसलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संपत आहेर, बाबासाहेब तुपे, कैलास चव्हाण, भास्कर कदम, गणपत सत्रे, शांताराम तुपे, विनायक थोरात, दत्तात्रय चव्हाण, श्रावण चव्हाण यांनी पैसे मिळत नसल्याची व्यथा मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com