agriculture news in marathi, MLA Bacchu Kadu Meets Sugar Commissioner in Pune | Agrowon

एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू कडूंचा साखर आयुक्तालयावर ‘प्रहार’ !
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी व साखर कारखानदारांकडून होणाऱ्या काटामारीच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी साखर आयुक्तालयात आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी आयुक्तांना घेराव टाकला तर काही थेट साखर संकुलच्या इमारतीवर चढल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली.
 

पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी व साखर कारखानदारांकडून होणाऱ्या काटामारीच्या विरोधात आमदार बच्चू कडू यांनी साखर आयुक्तालयात आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी आयुक्तांना घेराव टाकला तर काही थेट साखर संकुलच्या इमारतीवर चढल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली.
 
आ. कडू यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत आज (सोमवारी) मुद्देसुद चर्चा केली. यावेळी आयुक्तांच्या चारही बाजुंनी कार्यकर्ते जमा झाले होते. शोलेस्टाईल आंदोलनाची खासियत असलेल्या प्रहारचे काही कार्यकर्ते आयुक्तालयाच्या टेरेसवर चढल्यामुळे पोलिसांची धावपळ झाली.
 
बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली एफआरपीची विचारणा करताना शेतकरी.. पहा video

“शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना सरकार पाठिशी घालते आहे. सहकारमंत्र्याच्याच कारखान्याने कोटयवधी रुपये थकविले आहे. कारखान्यांची काटामारी थांबली नाही तर एक महिन्यानंतर सहकारमंत्र्यांची गाडी अडवली जाईल,’’ असा इशारा आ.कडू यांनी यावेळी दिला.
 
एफआरपी वसुलीसाठी पथक तयार करावे व संचालकांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, काटामारी विरोधात समिती तयार करावी तसेच फौजदारी कारवाई व्हावी, ऊस न नेल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशा जोरदार मागण्या आयुक्तांसमोर मांडल्या गेल्या.
 
साखर आयुक्त यावेळी म्हणाले की, हंगाम सुरू असतानाच ९४ टक्के एफआरपी देण्यात आली आहे. उर्वरित पेमेंटसाठी प्रय़त्न सुरू आहेत. ऑनलाईन कामकाज वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्यांमधील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲप्लिकेशन देखील तयार केले जात आहे. काटामारी व उतारा नोंद यात पारदर्शकता आणण्यासाठी उपाय सुचविले जातील.”

इतर अॅग्रो विशेष
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...