Agriculture news in marathi MLA Bhuyar took stock of the problems in the village | Agrowon

आमदार भुयार यांनी घेतला गावातील समस्यांचा आढावा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

अमरावती ः लॉकडाऊनच्या काळात गावस्तरावरील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, याकरिता आमदार देवेंद्र भुयार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्शी, वरुड तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जात ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

अमरावती ः लॉकडाऊनच्या काळात गावस्तरावरील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, याकरिता आमदार देवेंद्र भुयार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्शी, वरुड तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जात ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 

कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जनसामान्यांना भेडसावणाऱ्या  अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. या समस्यांची माहिती घेत प्रशासकीय पातळीवरुन त्यांच्या सोडवणुकीचे प्रयत्नही आमदार भुयार यांच्याकडून होत आहेत. वरुड, मोर्शी तालुक्‍यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जात त्यांनी गावातील नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उन्हाची तीव्रता वाढती असल्याने पाणीप्रश्‍न गंभीर होणार आहे.

त्याची दखल घेत पाणीपुरवठा योजनांची कामे, पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी याविषयी माहिती घेत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांच्याव्दारे दिल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सहाय्य योजनेतील कामाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

गावठाण व ई-क्‍लास जागेवरील नियमाकुल प्रस्ताव तसेच अतिक्रमण केलेल्या लोकांचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायतींनी वाढीव वीज खांबाचे प्रस्ताव तयार करावे. तसेच गाव तिथे व्यायामशाळा ही संकल्पना राबविण्याकरिता पुढाकार घ्यावा. त्याकरिता जागेचे प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले. 

गावस्तरावर कोरोना समिती
कोरोना नियंत्रणाकरिता जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनांचे पालन आवश्‍यक आहे. त्याकरीता गावातील युवकांनी पुढाकार घेत कोरोना ग्राम समिती स्थापन करावी. त्या माध्यमातून गावात कोणीही अनधिकृतपणे प्रवेश करणार नाही याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...