पीक नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार बोरसे पोचले बांधावर

नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे
नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी करताना आमदार दिलीप बोरसे

नाशिक  : विधानसभा निवडणुकीदरम्यान बागलाण तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा स्थितीत येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी बागलाण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार दिलीप बोरसे यांनी सत्कार समारंभाला फाटा देत थेट बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.  

दिवाळीच्या तोंडावर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना दिलासा देत नुकसानभरपाई मिळावी मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आमदार बोरसे यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. या वेळी त्यांनी कृषी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत द्राक्ष बागांच्या नुकसानीची पाहणी केली.   

पावसामुळे तालुक्यातील लखमापूर, विरगावपाडे, पिंगळवाडे, करंजाड, नीताने, लाडूद, बिजोटे, कुपखेडा, खिरमाणी, श्रीपुरवडे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, सोमपूर ब्राह्मणगाव, ठेंगोडा, मोरेनगर, सटाणा, औंदाणे, भाक्षी, मुळाणे, तरसाळी, वनोली, वीरगाव, डोंगरेज, वटार, चौधणे, कंधाने, निकवेल, जोरण, किकवारी, दसाने आदी गावांमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या भागाला बोरसे यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com