लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकी

तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यापुढे अखेर आमदार असं बिरुद लागलं... असं अरुण लाड यांच्या बाबतीत म्हणता येईल. गेली १४ वर्षे पुणे पदवीधर मतदारसंघात ते तयारी करीत होते. आज त्यांच्या परिश्रमाला यश आले. कुंडलच्या लाडांच्या घरात तब्बल ५८ वर्षांनंतर आमदारकी आली.
MLA in Lada's house after 58 years
MLA in Lada's house after 58 years

सांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्यापुढे अखेर आमदार असं बिरुद लागलं... असं अरुण लाड यांच्या बाबतीत म्हणता येईल. गेली १४ वर्षे पुणे पदवीधर मतदारसंघात ते तयारी करीत होते. आज त्यांच्या परिश्रमाला यश आले. कुंडलच्या लाडांच्या घरात तब्बल ५८ वर्षांनंतर आमदारकी आली.

स्वातंत्र्यपूर्व काळात सशस्त्र सेना उभी करून ब्रिटिशांशी लढणाऱ्या जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यानंतरही शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून व्यवस्थेविरोधात सतत संघर्ष केला. त्यांचे पुत्र असलेल्या अरुण यांच्या वाट्यालाही तोच संघर्ष आला आणि तो फळास आला. गतवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. लाड यांनी स्वबळावर ३७ हजार मते मिळवली होती. त्यांच्या या मतांमुळेच राष्ट्रवादीला त्यांच्या तयारीची जाणीव झाली. राष्ट्रवादीने यंदा त्यांच्या गळ्यात महाविकास आघाडीची उमेदवारी टाकून त्यांच्या आधीच्या तयारीला हत्तीचे बळ दिले.

या विजयाच्या निमित्ताने लोप्रोफाईल लाड प्रथमच राज्याच्या राजकीय नकाशात आले आहेत. खरे तर त्यांचे अंडरग्राऊंड काम खूप आधीपासूनचे. क्रांती उद्योग समूहातील प्रत्येक संस्था त्यांनी नेटाने चालवली आहे. राजकीयदृष्ट्या त्यांनी कधी स्वतःला कधीच प्रोजेक्‍ट केले नाही. सकाळी सांगलीतून घरूनच जेवणाचा डबा घेऊन क्रांती कारखान्यावर सकाळी आठला रेल्वेने हजर राहत त्यांनी कारखाना उभा केला. सचोटीने चालवला.

साखर, कारखाना, बॅंक, दूध संघ, पाणी सोसायट्या अशा सहकारातील विविध संस्थांचे जाळे त्यांनी विस्तारले. जे आजच्या काळात दुर्मिळ आहे. राजकीयदृष्ट्या त्यांना फारशी संधी मिळाली नाही तरीही त्यांनी कधी त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही. त्यांचा पासंग म्हणून मदत घेत शिडी करीत अनेकांनी सत्ता चाखली. बारा वर्षे म्हणजे तपभर ते पदवीधर मतदारसंघासाठी तपश्‍चर्या करीत होते. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचे पर्व म्हणजे एक सोनेरी पान. या पर्वातील अग्रदूत व तुफान सेनेचे सेनापती क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव. त्यांनी वडिलांची कीर्ती न सांगता सक्रिय समाजकारणात उद्योग समूहाचा वटवृक्ष उभारला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com