आमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी

आमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी
आमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी

शेंबाळपिंपरी, यवतमाळ  ः विभागातील काळ्या मातीतील सोयाबीनचा झालेला चिखल पाणावलेल्या डोळ्यांनी कास्तकार दाखवत होते. अन् तितक्‍याच आस्थेने नवनियुक्त आमदार इंद्रनील त्यांच्या संवेदना समजून घेत दिलासा देत होते.  माझा बळिराजा समृद्ध झाला पाहिजे, यासाठी शेतीत नवनवीन पिकांचा पायंडा घालणारे हरितक्रांतीचे प्रणेते (स्व.) वसंतराव नाईक यांची कास्तकारांप्रती असलेली तळमळ पुतण्या इंद्रनीलच्या रूपाने पुन्हा पाहावयास मिळाली. सद्यःस्थिती पाहता नुकसानीचा आकडा भरून न निघणारा असला, तरी दिलासाही कास्तकारांसाठी मोठी बाब आहे. आपण करीत असलेल्या मेहनतीचा झालेला चिखल शासनदरबारात आपली कैफियत मांडणाऱ्या लोकप्रतिनिंधीही पाहावा व मदत मिळविण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी त्याला आशा असते. नवनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी गवई, मंडळ कृषी अधिकारी नीलेश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य जैनुल सिद्दिकी, संतोष सूर्यवंशी, उस्मान डांगे, रउफोद्दीन सिद्दिकी यांच्यासह पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com