Agriculture news in marathi; MLA Naik examines the damage done | Agrowon

आमदार नाईक यांनी केली नुकसानीची पाहणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शेंबाळपिंपरी, यवतमाळ  ः विभागातील काळ्या मातीतील सोयाबीनचा झालेला चिखल पाणावलेल्या डोळ्यांनी कास्तकार दाखवत होते. अन् तितक्‍याच आस्थेने नवनियुक्त आमदार इंद्रनील त्यांच्या संवेदना समजून घेत दिलासा देत होते. 

शेंबाळपिंपरी, यवतमाळ  ः विभागातील काळ्या मातीतील सोयाबीनचा झालेला चिखल पाणावलेल्या डोळ्यांनी कास्तकार दाखवत होते. अन् तितक्‍याच आस्थेने नवनियुक्त आमदार इंद्रनील त्यांच्या संवेदना समजून घेत दिलासा देत होते. 

माझा बळिराजा समृद्ध झाला पाहिजे, यासाठी शेतीत नवनवीन पिकांचा पायंडा घालणारे हरितक्रांतीचे प्रणेते (स्व.) वसंतराव नाईक यांची कास्तकारांप्रती असलेली तळमळ पुतण्या इंद्रनीलच्या रूपाने पुन्हा पाहावयास मिळाली. सद्यःस्थिती पाहता नुकसानीचा आकडा भरून न निघणारा असला, तरी दिलासाही कास्तकारांसाठी मोठी बाब आहे. आपण करीत असलेल्या मेहनतीचा झालेला चिखल शासनदरबारात आपली कैफियत मांडणाऱ्या लोकप्रतिनिंधीही पाहावा व मदत मिळविण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी त्याला आशा असते. नवनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, गटविकास अधिकारी गवई, मंडळ कृषी अधिकारी नीलेश राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य जैनुल सिद्दिकी, संतोष सूर्यवंशी, उस्मान डांगे, रउफोद्दीन सिद्दिकी यांच्यासह पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार इंद्रनील नाईक यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...