प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार रायमुलकरांची धरणात उडी

पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाझरामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. या बाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कार्यवाही न झाल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली.
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार रायमुलकरांची धरणात उडी MLA Raimulkar jumps into the dam to demand the project victims
प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार रायमुलकरांची धरणात उडी MLA Raimulkar jumps into the dam to demand the project victims

बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाझरामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. या बाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कार्यवाही न झाल्याने सोमवारी (ता. २१) शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी थेट पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. यामुळे प्रशासनाची एकच पळापळ झाली.  मेहकर तालुक्यात पेनटाकळी प्रकल्प असून, या प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे २८९ शेतकऱ्यांचे २७२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. या संदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत पाटबंधारे अधिकाऱ्यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव न पाठविल्याने संतापलेले शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. तिथेच आंदोलन सुरू करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.  या बाबत रायमूलकर म्हणाले, ‘‘दर वर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी किती काळ आर्थिक झळ सहन करायची. पावसाळ्यात कालव्याद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे व जमिनीचे नुकसान होत असते. जोपर्यंत कालवा दुरुस्तीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’’ आंदोलनाच्या ठिकाणी सुरुवातीला पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी उपस्थित नव्हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com