Agriculture news in marathi MLA Raimulkar jumps into the dam to demand the project victims | Page 3 ||| Agrowon

प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी आमदार रायमुलकरांची धरणात उडी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

 पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाझरामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. या बाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कार्यवाही न झाल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी  पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली.

बुलडाणा : जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याच्या पाझरामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. या बाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कार्यवाही न झाल्याने सोमवारी (ता. २१) शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी थेट पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. यामुळे प्रशासनाची एकच पळापळ झाली. 

मेहकर तालुक्यात पेनटाकळी प्रकल्प असून, या प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे २८९ शेतकऱ्यांचे २७२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. या संदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठकीत पाटबंधारे अधिकाऱ्यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव न पाठविल्याने संतापलेले शिवसेना आमदार संजय रायमूलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेतली. तिथेच आंदोलन सुरू करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

या बाबत रायमूलकर म्हणाले, ‘‘दर वर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी किती काळ आर्थिक झळ सहन करायची. पावसाळ्यात कालव्याद्वारे सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे व जमिनीचे नुकसान होत असते. जोपर्यंत कालवा दुरुस्तीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.’’ आंदोलनाच्या ठिकाणी सुरुवातीला पाटबंधारे विभागातील एकही अधिकारी उपस्थित नव्हता.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...