सरकार निष्क्रिय म्हणून दुष्काळग्रस्तांची पत्राद्वारे शरद पवारांकडे कैफियत

सरकार निष्क्रिय म्हणून दुष्काळग्रस्तांची पत्राद्वारे शरद पवारांकडे कैफियत
सरकार निष्क्रिय म्हणून दुष्काळग्रस्तांची पत्राद्वारे शरद पवारांकडे कैफियत

लातूर  : " मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. सरकारकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांसह सर्व घटक अस्वस्थ आहेत. यातील अनेक लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पत्र पाठवून दुष्काळात सरकारकडून काहीच मदत मिळत नसल्याची माहिती देत आहेत. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या मदतीही आठवण करून करून देत आहेत.  बारामती येथे दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेतून ही माहिती मिळाली ,"  असे  शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले .  दिवाळीनिमित्त आमदार काळे यांनी श्री. पवार यांची भेट घेऊन तब्बल पाऊणतास मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती तसेच विविध प्रश्नांवर चर्चा केली. चर्चेत आमदार काळे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता त्यांना सांगितले. आतापासूनच अनेक गावांत पाणीटंचाई असून रब्बीचे पिक घेता न आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या स्थितीत सरकारकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे आमदार काळे यांनी    सांगितले. 

" त्यावर शरद  पवार यांनी मराठवाड्यातील दुष्काळाबाबत सरकारने गंभीर होण्याची गरज व्यक्त केली. दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीसाठी धाऊन जाणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. केवळ घोषणा करून नव्हे तर प्रत्यक्ष मदत करावी लागेल, याची जाणीव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दिली आहे असे शरद पवार यांनी सांगितले आहे, "असे विक्रम काळे  यांनी सांगितले. 

" फिल्डवर जा, बैठका घ्या, लोकांशी बोला, आदी सुचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. ऊस गाळपातील अडचणी दूर करून साखर कारखाने लवकर सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी गरज पडल्यास स्वतः शरद पवार यांनी  मध्यस्थी करण्याची  तयारी मुख्यमंत्र्यांना दाखवली आहे ," असे विक्रम काळे   यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com