Agriculture news in marathi MLA will knock on the door | Agrowon

आमदारांच्या दारात हलग्या वाजविणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

 उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने १७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या दारात हलग्या वाजून त्यांना जागे करणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला.

सोलापूर ः उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याबाबत झालेल्या निर्णयावर जिल्ह्यातील आमदार बोलायला तयार नाहीत. या आमदारांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने १७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या दारात हलग्या वाजून त्यांना जागे करणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला.

हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे आयोजित बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. समितीचे सचिव माउली हळणवर, उपाध्यक्ष अॅड. बापूराव मेटकरी, सदस्य धनाजी गडदे, दीपक भोसले, दीपक वाडदेकर आदी उपस्थित होते.

खुपसे म्हणाले, की उजनीतील पाण्यावर सोलापूरकरांचा हक्क आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एवढा मोठा निर्णय झाला, पण एकही आमदार यावर बोलायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. जोपर्यंत हा आदेश रद्द होत नाही. तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करू. आता आमदारांना जागं करण्याची वेळ आली आहे. 

या वेळी भोसले म्हणाले, की जिल्ह्याला मंत्रिपद न देण्यामागे महाविकास आघाडीचे षड्‍यंत्र उघड झाले आहे. जिल्ह्याला जर मंत्रिपद दिले असते, तर कदाचित याला विरोध केला असता. मात्र आज पाच टीएमसी पाणी चोरून नेण्याचा निर्णय होईपर्यंत एकालाही माहीत नव्हते, या मागचे राजकारण लक्षात येते, असेही ते म्हणाले. माउली हळणवर यांनीही ‘आम्ही आता मागे हटणार नाही. आम्हाला अडवून बघाच,’ असा इशारा दिला.  या वेळी किरण भांगे, रुक्मिणी दोलतडे, मेजर बिराप्पा दोलतडे, अप्पासाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष मेटकरी उपस्थित होते.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...