पुणे विभागात ३४ हजार मजुरांसाठी मनरेगाची कामे मंजूर

चौतीस हजार मजुरांसाठी मनरेगाची कामे मंजूर
चौतीस हजार मजुरांसाठी मनरेगाची कामे मंजूर

पुणे : ‘‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे विभागात एप्रिल-मे महिन्यात ३४ हजार ३०८ मजुरांना मनरेगाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. विभागात सध्या २ हजार ४१५ ठिकाणी कामे सुरू आहेत. विभागासाठी ५९ हजार ७५९ कामांची संख्या आहे. १३४.०७ लक्ष मजुरांना ही कामे मिळू शकतात,’’ अशी माहिती पुणे विभागातील मनरेगाचे अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी दिली. 

आवटे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या व ग्रामपंचायत विभागातर्फे मनरेगाच्या कामाचा कृती आराखडा तयार केला जातो. मनरेगातून वृक्ष लागवड, रस्त्यांची कामे, नर्सरीच्या कामे, कुक्कुटपालन शेड, वैयक्तिक लाभासाठी विहिरी, जनावरांचे गोठे, शेळीपालन शेड, शेततळ आदी कामे केली जातात. पुणे विभागात एकूण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १८४६ कामे सुरू आहेत. त्यासाठी २३३९६ मजूर कामावर उपस्थित आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात ५६९ कामे सुरू आहेत. त्यासाठी १०९१२ मजूर कामावर उपस्थित आहेत. पुणे विभागात एकूण २४१५ कामे सुरू असून, त्यासाठी ३४३०८ मजूर कामे करत आहेत.’’

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३६३ कामे सुरू आहेत. त्यासाठी २१७३ मजूर, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात ६७ कामे सुरू, तर त्यावर ३८८ मजूर आहेत. जिल्ह्यात एकूण ४३० कामे सुरू आहेत. त्यासाठी २५६१ मजूर कामे करत आहेत.

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५७९ कामे सुरू, त्यावर २९६७ मजूर, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून २११ कामे सुरू, त्यावर ११५९ मजूर, तर एकूण ७९० कामे सुरू, त्यावर ४१२६ मजूर कामे करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रापंचायतीद्वारे २५९ कामे, त्यावर ५१३१ मजूर, यंत्रणेद्वारे ७४ कामे, त्यावर २७२९ मजूर आणि एकूण ३३३ कामे सुरू, त्यावर ७८६० मजूर कामे करत आहेत.

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायतीद्वारे ३४५ कामे, त्यावर २५६९ मजूर, यंत्रणेद्वारे २४९ कामे, त्यासाठी ३५६२ मजूर, एकूण ४९४ कामे सुरू, त्यावर ६१३१ मजूर कामे करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीद्वारे ३०० कामे, त्यावर १०५५६ मजूर, यंत्रणेद्वारे ६८ कामे, त्यावर ३०७४ मजूर, तर एकूण ३६८ कामे सुरू, त्यावर १३६३० मजूर कामे करत असल्याची माहिती मिळाली. 

ग्रामपंचायतींद्वारे ५० टक्के कामे 

पुणे विभागात एकूण कामांपैकी ५० टक्के कामे ग्रामपंचायतीतर्फे केली जातील. उर्वरित कामे अन्य यंत्रणेतर्फे होतील. त्यामध्ये सार्वजनिक बांधकम विभाग, कृषी विभाग, लघू पाटबंधारे, वन विभागाचा समावेश आहे. मजुरांच्या मागणीनुसार ही कामे केली जातील. मजुरांची संख्या वाढल्यास कामांची संख्या वाढविता येते, तसेच त्यासाठी अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जातो, असे आवटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com