इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो: राज ठाकरे

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो: राज ठाकरे
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो: राज ठाकरे

मुंबई : कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करत हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (इव्हीएम) विजय असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर इव्हीएमला दोष देण्यात आला होता. उत्तर प्रदेशात भाजपने विजय मिळविल्यानंतर मायावती यांनी इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले होते. इतर राज्यांतही इव्हीएमलाच दोष देण्यात आला होता. आता कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर राज ठाकरेंसह काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनीही इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटर आणि फेसबुक पेजवरून ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो असे म्हटले आहे. तर, मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे, की मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की भारतातील प्रत्येक पक्षाने इव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. भाजपनेही यापूर्वीही हे केलेले आहे. सगळ्याच पक्षांना इव्हिएमबद्दल प्रश्न असेल तर बॅलेटच्या साहाय्याने निवडणुका घेण्यास काय हरकत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com