Agriculture news in Marathi, MNS to contest 100 seats? | Agrowon

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा लढविणार?

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी मनसे नेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी मनसे नेत्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व विभाग प्रमुखांना इच्छूक उमेदवारांची यादी करण्याचे आदेश दिले होते. तसेच विधानसभेची तयारी कशी केली आहे, त्या प्रमाणे विजयी होण्याची शक्यता किती आहे याची चाचपणी करून माहिती तयार करण्यास सांगितली होती. त्यानुसार ही माहिती जमा झाली आणि त्या माहितीच्या आधारे एकूण १०० जागांवर निवडणूक लढविण्याच्या या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, पंढरपूर, खेड, हिंगोली या ठिकाणी मनसेचा प्रभाव आहे. त्यामुळे या भागात आपले उमेदवार देण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या संदर्भात राज ठाकरे येत्या १ ते २ दिवसात आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

या बैठकीनंतर राज ठाकरेंनी काही नेत्यांना पुणे व नाशिक येथे रवानाही केले आहे. हे नेते या ठिकाणी इच्छूकांच्या मुलाखती घेऊन त्यांची किती तयारी आहे. तसेच या ठिकाणी विजयाची किती शक्यता आहे याची चाचपणी करणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...