पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार गाजर

पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार गाजर
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार गाजर

यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याच आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. याचा विरोध म्हणून नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मनसेकडून जिल्हाभर गाजर वाटली जाणार आहेत.  महिला बचत गट मेळाव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता. १६) पांढरकवडा येथे येत आहेत. त्याच दिवशी मनसे जिल्ह्यात गाजर वाटप करून त्यांच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविणार असल्याची माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात सर्वसामान्यांच्या कोणत्याच प्रश्‍नांची सोडवणूक भाजपकडून करण्यात आली नाही. निवडणुकीपूर्वी मात्र शेतकऱ्यांना हमीभावासह दीडपट दराचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता केली नाही. परिणामी या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी राहील आणि त्याचा मतांवर परिणाम होईल, या भीतीतून वर्षाला सहा हजार रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. या माध्यमातूनदेखील शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याचा आरोप राजू उंबरकर यांनी केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अलीकडे मोदींची भाषणे व त्यांनी दिलेली आश्‍वासने केवळ थट्टेच विषय ठरत असल्याचेही उंबरकर म्हणाले. मोदींच्या दौऱ्याची तारीख आणि गाजरवाटप कार्यक्रमाचा मुहूर्त हा निव्वळ योगायोग नाही, असे मानले जात आहे. गाजर हे आरोग्यासाठी उपयुक्‍त आहे. आश्‍वासनाची गाजर खाऊन मात्र नागरिकांची प्रकृती बिघडल्याचा टोलाही उंबरकर यांनी लगावला. नागरिकांचे बिघडलेले आरोग्य सुधारावे याकरिता गाजरवाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com