मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार

मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार
मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सोमवारी (ता. ३०) केली. या वेळी राज ठाकरेंनी मनसेचे दोन उमेदवारही जाहीर केले. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचे या वेळी सांगितले. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करणार, रोज चार-पाच नावे जाहीर करणार, असे ते म्हणाले. 

मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हेसुद्धा मनसेत दाखल झाले. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील, असे या वेळी राज ठाकरे यांनी जाहीर केले. राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार यांना पक्षप्रवेश देताना त्यांची उमेदवारीही जाहीर केली.

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी गेल्या वर्षी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते, त्यांचे उपचारादरम्यान २८ जानेवारीला निधन झाले होते. नरेंद्र पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर केले नसले तरी, ते धुळ्यातूनच लढतील अशी आशा आहे.

नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला. दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. मात्र त्यांनी रविवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर केल्याचे बोलले जात आहे. या वेळी राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील, अशी आशा होती, मात्र त्यांनी  पुढचा प्लॅन न सांगता जाता जाता फटकेबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com