‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित

Mobile application developed for 'Seva hami'
Mobile application developed for 'Seva hami'

सोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी, यासाठी RTS Maharashtra हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा’’, असे आवाहन जिल्हाधिकरी मिलींद शंभरकर यांनी केले. 

सेवा हमी हक्क कायद्याची अमलबजावणी व्हावी, यासाठी आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा घेतला. यात सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महाऑनलाईनचे जिल्हा समन्वयक शशिकांत इगवे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प संचालक रिझवान मुल्ला आदी सहभागी झाले होते. 

प्रत्येक कार्यालयाबाहेर सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवा बद्दल माहिती दर्शक फलक लावा. नागरिकांना जलद सेवा द्यावी, अशा सूचना शंभरकर यांनी उपस्थित विभागप्रमुखांना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, कृषि उपसंचालक रवींद्र मानेआदी उपस्थित होते.

४२ विभागातील ४७६ सेवांचा समावेश 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनिनियम (सेवा हमी कायदा ) २०१५ लागू झाला आहे. राज्यातील ४२ विभागांतील ४७६ सेवा या कायद्यानुसार अनुसूचित करण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी प्रभावी व्हावी व नागररिकांना सहज सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.

या ॲपमुळे नागरिकांना या सेवा कोठुनही मिळवता येतील. अर्जाची स्थिती, विभागाने काढलेली त्रुटी, त्याची पूर्तता सर्व काही ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या करता येईल. सेवा मिळण्यास झालेल्या विलंबाबद्दल तक्रार करता येणे शक्‍य होईल, असे मुल्ला यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com