agriculture news in Marathi mobile ban in Vitthal temple form 1 January Maharashtra | Agrowon

विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जानेवारीपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या सोमवारी (ता.९)  झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीकडे जमा झालेली नाणी बॅंका स्वीकारत नसल्याने समितीकडे तब्बल ५५ लाख रुपयांची नाणी पडून आहेत. एचडीएफसी बॅंकेने ही नाणी घेण्याची तयारी दर्शवली असल्याने त्या बॅंकेत खाते उघडून ही नाणी मुदत ठेव स्वरूपात जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

पंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जानेवारीपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या सोमवारी (ता.९)  झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीकडे जमा झालेली नाणी बॅंका स्वीकारत नसल्याने समितीकडे तब्बल ५५ लाख रुपयांची नाणी पडून आहेत. एचडीएफसी बॅंकेने ही नाणी घेण्याची तयारी दर्शवली असल्याने त्या बॅंकेत खाते उघडून ही नाणी मुदत ठेव स्वरूपात जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अंतर्गत सुरक्षेसाठी ३४ सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे ठरवण्यात आले. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी दरम्यान श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात जेसीबी मशिन घुसल्याने संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास तसेच अतुल महादेव आळशी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांकडे प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. 

श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्‍मिणी सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यक्रम वगळून सप्ताह, भजन, कीर्तन आणि अन्य कार्यक्रमासाठी स्पीकर लावण्यास बंदी करण्याचे ठरले. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी भक्त निवासाच्या प्रसिद्धीसाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यास व भक्त निवासमधील तबक उद्यान प्रतिदिन ५० हजार रुपयेप्रमाणे योग्य अटी आणि शर्तींवर भाडे तत्त्वावर देण्याचे ठरले. तेथील गाळे व ऑफिसेस ई-लिलाव पद्धतीने मासिक भाड्यावर बोली न लावता सुरक्षा रकमेवर भाडे तत्त्वावर देण्याचे ठरवण्यात आले. 

निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाच्या धर्तीवर मंदिरावरील ध्वज उभारण्यास व श्री संत नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती मंदिर समितीमार्फत साजरी करावी तसेच संत नामदेव पायरीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते.


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...