संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
बातम्या
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी
पंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ जानेवारीपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या सोमवारी (ता.९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंदिर समितीकडे जमा झालेली नाणी बॅंका स्वीकारत नसल्याने समितीकडे तब्बल ५५ लाख रुपयांची नाणी पडून आहेत. एचडीएफसी बॅंकेने ही नाणी घेण्याची तयारी दर्शवली असल्याने त्या बॅंकेत खाते उघडून ही नाणी मुदत ठेव स्वरूपात जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अंतर्गत सुरक्षेसाठी ३४ सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे ठरवण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी दरम्यान श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात जेसीबी मशिन घुसल्याने संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास तसेच अतुल महादेव आळशी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांकडे प्रत्येकी अडीच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल सभामंडप व श्री रुक्मिणी सभामंडप येथे मंदिर समितीचे कार्यक्रम वगळून सप्ताह, भजन, कीर्तन आणि अन्य कार्यक्रमासाठी स्पीकर लावण्यास बंदी करण्याचे ठरले. श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवासाच्या प्रसिद्धीसाठी शहरात विविध ठिकाणी फलक लावण्यास व भक्त निवासमधील तबक उद्यान प्रतिदिन ५० हजार रुपयेप्रमाणे योग्य अटी आणि शर्तींवर भाडे तत्त्वावर देण्याचे ठरले. तेथील गाळे व ऑफिसेस ई-लिलाव पद्धतीने मासिक भाड्यावर बोली न लावता सुरक्षा रकमेवर भाडे तत्त्वावर देण्याचे ठरवण्यात आले.
निगडी येथील भक्ती-शक्ती चौकाच्या धर्तीवर मंदिरावरील ध्वज उभारण्यास व श्री संत नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती मंदिर समितीमार्फत साजरी करावी तसेच संत नामदेव पायरीचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते.
- 1 of 1504
- ››