Agriculture news in marathi Mobile Dispensary started in Solapur | Agrowon

सोलापुरात फिरता दवाखाना सुरु

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजूंना आरोग्य तपासणी करणे शक्य व्हावे, म्हणून फिरता दवाखाना (मोबाईल डिस्पेन्सरी) सुरु करण्यात आला आहे.

सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजूंना आरोग्य तपासणी करणे शक्य व्हावे, म्हणून फिरता दवाखाना (मोबाईल डिस्पेन्सरी) सुरु करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 

या फिरत्या दवाख्यानामध्ये वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आजारी व्यक्तींच्या घरात जाऊन तपासणी करतील, वैद्यकीय सल्ला देतील. शहर हद्दीतील गावठाण भागात सकाळी १० ते २, तर जुळे सोलापूर परिसरात दुपारी २ ते ६ या कालावधीत हा दवाखाना उपलब्ध असेल.

ही वैद्यकीय सेवा मोफत आहे. रुग्णांनी श्याम पाटील (८९९९९०८६६०) यांच्याशी संपर्क साधावा. या फिरत्या दवाखान्याच्या कामकाजास जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष केतन शहा, श्याम पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप कुमार ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते. 

या स्वरुपाच्या वैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवण्याचा जिल्हा प्रशासन विचार करत आहे. तरी, स्वेच्छेने वैद्यकीय सेवा देण्यास इच्छुक असणारे डॉक्टर आणि परिचारक यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंभरकर व शाह यांनी केले. 
 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...