Agriculture News in Marathi Mobile Raswanti became the basis of agriculture | Agrowon

 मोबाइल रसवंती ठरली शेतीला आधार 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

रोजगार आणि नोकरीच्या शोधात अनेक युवक तरुण असताना एका युवा शेतकऱ्याने मात्र हातावर हात धरून न राहता, नोकरीसाठी हेलपाटे न मारता. मोबाइल रसवंतीच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून घेतला आहे. दत्ता रामराव राऊत, असे आहे. 

आर्णी, जि. यवतमाळ ः रोजगार आणि नोकरीच्या शोधात अनेक युवक तरुण असताना एका युवा शेतकऱ्याने मात्र हातावर हात धरून न राहता, नोकरीसाठी हेलपाटे न मारता. मोबाइल रसवंतीच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून घेतला आहे. दत्ता रामराव राऊत, असे या उद्यमशील युवकाचे नाव असून, तो आर्णी तालुक्‍यातील सायखेड गावातील रहिवासी आहे. 

दत्ता राऊत यांच्याकडे अवघी चार एकर शेती. कुटुंबात वडील रामराव राऊत, आई रुख्मा, पत्नी कल्पना, पाच वर्षांची मुलगी खुशी तर तीन वर्षांचा मुलगा विश्‍वजित अशा सहा जणांचा समावेश आहे. जेमतेम शेतीधारणेतील उत्पादकतेच्या बळावर सहा जणांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे नजीकच्या काळात आव्हानात्मक ठरत होते. त्यातच गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलांमुळे शेतीक्षेत्रातही अनिश्‍चिततेचे वार वाहत आहे.

परिणामी, उत्पादकता खर्चाची देखील भरपाई अनेकदा झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या हंगामाची सोय उसनवारीच्या बळावरच होत होती. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा आणि रोजच्या खर्चासाठी लागणारा पैसा कोठून उभा करायचा, अशा विवंचनेत दत्ता राऊत होते. यावर मात करावी म्हणून त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा विचार सुरू केला.

त्याकरिता अवघ्या १५ हजार रुपयांत जुन्या मोटारसायकलची खरेदी त्यांनी केली. वीस हजार रुपयांना उसाचा रस काढण्याचे संयंत्र घेण्यात आले. मोटारसायकलवर हे संयंत्र बसविण्यासाठी लावलेल्या जाळीवर ४० हजार रुपयांचा खर्च झाला. याप्रमाणे ७५ हजार रुपयांत त्यांची मोबाइल रसवंती तयार झाली. 

या गावांत पोहोचते रसवंती 
दत्ता राऊत मोबाइल रसवंती घेऊन सायखेडा गावातून सकाळी आठ वाजता बाहेर पडतात. आर्णीसह दिग्रस तालुक्‍यातील महाळुंगी, जोगलदरी, आरंभी, झीरपूर, उमरी, शिरपूर, चिरकुटा, सावंगा या गावांत जात ते रसाची विक्री करतात. दिवसाकाठी ५०० ते ६०० रुपयांचे उत्पन्न होते. दोन लिटर पेट्रोल दुचाकीला रोज लागते. मात्र स्वतःचा व्यवसाय असल्याचे समाधान यातून मिळते, असा आशावाद या तरुण शेतकऱ्याने व्यक्‍त केला. 


इतर अॅग्रो विशेष
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
मसाला उद्योगासोबत सेंद्रिय शेतीकडे...लवळे (ता.मुळशी, जि. पुणे) येथील ज्योती दत्तात्रय...
‘रिलायन्स’ पीकविमा भरपाई देण्यास तयारपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी दहा...
नाशिकमध्ये भरला साहित्यप्रेमींचा मेळा नाशिक : येथील कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४व्या...
देशात ४७.२१ लाख टन साखरेचे उत्पादनकोल्हापूर : देशातील साखर हंगाम वेगाने सुरू झाला...
बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची...
कृषी शिक्षणाचा टक्का घसरलापुणे ः राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा गाडा...
राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची...पुणे : राज्यात बुधवारपासून (ता. १) पावसाने हजेरी...
राज्यातील द्राक्ष बागांना १० हजार...सांगली ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने पूर्व...
पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाला...पुणे ः पामतेलाचे दर वाढल्याने सोयाबीन आणि...