शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून बाजाराशी जोडणार

शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून बाजाराशी जोडणार
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून बाजाराशी जोडणार

नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील अनिश्चितता कमी करून शेतकऱ्यांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दराचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. निर्यातदार, कृषी उद्योग, मोठे खरेदीदार यांना शेतकऱ्यांबरोबर जोडण्यासाठी केंद्राने कृषी उत्पादन आणि पशुधन करार शेती आणि सेवा कायदा-२०१८ (ॲग्रीकल्चरल प्रोड्यूस ॲन्ड लाइव्हस्टॉक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ॲन्ड सर्व्हिस ॲक्ट-२०१८) ला मान्यता दिली आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्थांना या कायद्याचा लाभ आणि संरक्षण मिळणार आहे. दरम्यान, करार शेती ही बाजार समित्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली असून, शेतकरी आणि त्यांच्या जमिनींनाही संरक्षण देण्यात येणार असल्याचे यात म्हटले आहे.    

देशातील शेतकऱ्यांना थेट मोठे खरेदीदारांशी जोडून त्यांना थेट दराचा लाभ घेता यावा, यासाठी कृषी उत्पादन आणि पशुधन करार शेती आणि सेवा कायदा-२०१८ अमलात आणणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगिले होते. त्यानुसार केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच दिल्ली येथील विज्ञान भवन येथे नवा मॉडेल ॲक्ट जाहीर केला. या कायद्याविषयीचे पत्र राज्य सरकारांना पाठविण्यात आले आहे. करार शेती कायद्यात शेतकरी उत्पादक संस्थांचा (एफपीओ) महत्त्वाचा सहभाग असणार आहे. शेतकरी उत्पादक संस्था या शेतकऱ्यांच्या वतीने खाद्य कंपन्या, निर्यातदार यांसारख्या मोठ्या खरेदीदार प्रायोजक कंपन्यांशी करार करणार आहेत.    करार शेती कायद्याचे स्वरूप

  • या कायद्यात शेतकऱ्यांचे हित जोपासण्यावर भर देण्यात आला आहे. करार करताना दोन पक्षांमध्ये शेतकऱ्यांना कुमकुवत घटक मानून संरक्षण केले आहे. 
  • उत्पादनपूर्व, उत्पादन आणि उत्पादनानंतरच्या मूल्यवर्धन साखळीतील सेवांचा करार शेतीच्या सेवा करारमध्ये समावेश करण्यात आला आहे.  
  • दोन्ही पक्षांमधील करार करताना प्रायोजकांची आॅनलाइन नोंदणी आणि नोंदीसाठी जिल्ही/ब्लॉक/तालुका पातळीवर ‘अधिकारी’ किंवा ‘नोंदणी आणि करार नोंद समिती’ नेमण्यात येणार आहे.
  • करार झालेले उत्पादनाला हे पीक/पशुधन विम्याचे संरक्षण मिळणार आहे. 
  • नव्या करार शेतीत बाजार समित्यांच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.
  • हा कायदा केवळ प्रोत्साहनात्मक आहे. शेतकऱ्यांची शेती किंवा जमिनीविषयी कोणत्याही प्रकारचा स्थायी आराखडा तयार केलेला नाही.
  • या कायद्यानुसार प्रायोजकांच्या इच्छेप्रमाणे जमीन वाया घालवता येणार नाही.
  • लहान व सिमांत शेतकऱ्यांना करारात सहभागी होण्यासाठी एकत्र आणण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था/शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांनी मान्यता दिली असल्यास शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपन्यांना खरेदीदारांशी करार करू शकतात. 
  • खरेदीदारांना एकदा करार झाल्यानंतर मालकी किंवा अधिकार बदलण्याचा अधिकार नाही. 
  • खरेदीदारांना करार झाल्यानंतर करार केल्याप्रमाणे एक किंवा एकापेक्षा जास्त शेती उत्पादन, पशुधन खरेदी करावे लागेल.
  • पंचायत आणि गावपातळीवर करार शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी करार शेती प्रोत्साहन गट स्थापन करण्यात येणार आहे. 
  • करार शेतीत उद्भवणारे तंटे किंवा वाद सहज व सुलभपणे आणि लवकर मिटविण्यासाठी खालच्या पातळीवर निवारण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.   
  • हा केवळ प्रोत्साहन आणि सुविधाजनक कायदा असून, त्याची रचना नियंत्रणात्मक नाही.  Model Agriculture Produce and Livestock Contract Farming and Services (Promotion & Facilitation) Act, 2018
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com