agriculture news in marathi, moderate rain in district, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्रावण सरींचा जोर आता ओसरला आहे. जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांतील काही भागांत गुरुवारी (ता. १५)  हलक्या पावसाने हजेरी लावली. जुन्नर तालुक्यातील राजूर येथे सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद झाली.  

पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्रावण सरींचा जोर आता ओसरला आहे. जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांतील काही भागांत गुरुवारी (ता. १५)  हलक्या पावसाने हजेरी लावली. जुन्नर तालुक्यातील राजूर येथे सर्वाधिक ४० मिमी पावसाची नोंद झाली.  

पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र, मागील काही दिवसांपासून या भागात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहे. गुरुवारी मुळशीमधील माले येथे ३३, पौडमध्ये १३, घोटावडे येथे १०, मुठे येथे २७, पिरंगुट येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली.

भोरमधील आंबवडे येथे २२ मिलिमीटर पाऊस झाला. भोलावडे येथे २१, नसरापूर येथे ५, किकवी येथे ७, संगमनेर येथे १५, निगुडघर येथे २०, भोर येथे एक मिमी पावसाची नोंद झाली. मावळमधील वडगाव मावळ येथे सहा, तळेगाव येथे चार, काळे कॉलनी येथे १४, कार्ला येथे ३३, खडकाळा येथे सहा, लोणावळा येथे ३७, शिवणे येथे १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वेल्ह्यातील पानशेत येथे पाच, विंझर येथे एक मिमी पावसाची नोंद झाली. आंबवणे येथे हलका पाऊस झाला. हवेलीतील पुणे शहर, खडकवासला, भोसरी, चिंचवड येथेही तुरळक सरी कोसळल्या. 

उत्तरेकडील जुन्नर तालुक्यातही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. डिंगोरे येथे १०, आपटाळे येथे ४ मिमी पावसाची नोंद झाली. खेडमधील वाडा येथे २०, कुडे येथे १०, पाईट येथे दोन, चाकण येथे एक, कडूस येथे दोन मिमी पावसाची नोंद झाली. आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव येथे हलका पाऊस पडला. पूर्वेकडील तालुक्यांतही पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावली. अनेक ठिकाणी हवामान ढगाळ होते. शिरूरमधील कोरेगाव, इंदापूरातील भिगवण, इंदापूर,पुरंदरमधील सासवड, भिवंडी येथे पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या. काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता.  


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...