agriculture news in marathi, Moderate rain in Khandesh; miss in Nandurbar | Agrowon

खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 सप्टेंबर 2018

आमच्या भागात रिमझिम पाऊस होता. जोरदार पाऊस कुठेही नव्हता. परंतु, रब्बीसाठी पुढे अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.
- अजीत पाटील, शेतकरी, गाळण (ता. पाचोरा, जि.जळगाव)

आमच्याकडे शुक्रवारी मध्यरात्री काही वेळ जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी सकाळी मात्र रिमझिम पाऊस सुरू होता. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- अॅड. प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)

जळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व शनिवारी (ता.२२) सकाळी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नंदुरबारात मात्र पावसाने हुलकावणी दिली. पाऊस झालेल्या भागातील कोरडवाहू कापूस, ताग या पिकांना लाभ झाला आहे. पुढे रब्बीसाठीदेखील पोषक वातावरण असेल, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

जळगावात शुक्रवारी रात्री काही वेळ जोरदार पाऊस झाला. मग मध्येच पाऊस बंद झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत भिज पाऊस सुरू होता. नदी, नाल्यांना कुठेही पूर आला नाही. नंदुरबार जिल्ह्यात मात्र शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपर्यंत पाऊस नव्हता. फक्त ढगाळ वातावरण कायम होते. धडगाव व अक्कलकुवा येथे काही पाड्यांवर तुरळक पाऊस झाला. शहादा, तळोदा, नवापुरात मात्र पाऊसच आला नाही.

पूर्वहंगामी कापसाचे नुकसान
पूर्वहंगामी कापसात उमललेली बोंडे ओली होऊन त्यांचे नुकसान झाल्याची माहिती जळगाव, चोपडा, यावल भागातून मिळत आहे. या कापसाचा दर्जा घसरेल. तसेच तो वेचणीसाठीदेखील सुकर जाणार नाही. पाऊस सुरूच राहिल्यास कापूस काळवंडून १०० टक्के नुकसान होईल, असे सांगण्यात आले.

कोरडवाहू कापूस, उशिरा पेरलेली ज्वारी, ताग या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीदेखील वाफसा मिळेल. आणखी पाऊस आला तर रब्बीची पेरणी १०० टक्के साध्य होऊ शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)
जळगाव ११, चोपडा ७, यावल ९, रावेर ७, पाचोरा ६, पारोळा ८, अमळनेर ९, एरंडोल ८, धरणगाव ११, भुसावळ ६, जामनेर ६, चाळीसगाव ७, भडगाव ८. धुळे जिल्हा - धुळे ६, शिरपूर ५, शिंदखेडा ८. शिरपूर, मुक्ताईनगर, बोदवड या भागातील पावसाची आकडेवारी मिळू शकली नाही.

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...