शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  शेतकऱ्यांच्या फायद्याची : दादा भुसे

आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पीक पेरणी केल्यास शेतकऱ्याला उत्पन्न वाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  शेतकऱ्यांच्या फायद्याची : दादा भुसे Of modern technology to agriculture Benefit of joint farmers: Dada Bhuse
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  शेतकऱ्यांच्या फायद्याची : दादा भुसे Of modern technology to agriculture Benefit of joint farmers: Dada Bhuse

नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून, त्या दृष्टीने शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे जोमात सुरू झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर अधारित बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पीक पेरणी केल्यास शेतकऱ्याला उत्पन्न वाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.           राज्यात २१ जून ते ०१ जुलै २०२१या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह राज्यात राबविण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यातील वडगाव येथे शेतीनिष्ठ शेतकरी भागवत बलक यांच्या शेतावर सोमवारी (ता. २१) राज्यस्तरीय प्रारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी भुसे म्हणाले, ‘‘खरीप हंगामाच्या दृष्टीने राज्यात युरियाचा बफर स्टॉक केला असून, युरियाचा महाराष्ट्रात तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शेतकऱ्यानी खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, मका व हरबरा पिकांच्या पेरणीसाठी बीबीएफ पेरणी यंत्र खूप उपयुक्त असून, या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास निविष्ठा खर्चात २० ते २५ टक्के बचत होऊन, उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढ निश्चित मिळते. अवर्षणप्रवण क्षेत्रात याचा उपयोग प्रभावीपणे होऊ शकतो.’’       कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद  साधला. पीकविमा व फळपीक विमा एेच्छिक केला आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्राकडे विमासंबधी बीड मॉडेल सादर केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. कोरोना काळात बळिराजा ठरला सर्वांचा पोशिंदा  आपण गेल्या वर्षापासून कोरोना संकटाचा सामना करत आहोत. पाच ते सहा महिन्यांचा लॉकडाउन कालावधी आपण सर्वांनी अनुभवला आहे. या कालावधीत सर्वच व्यवहार बंद होते, परंतु सर्वांपर्यत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध हे वेळेत पोहोचले, याचे सर्व श्रेय माझ्या बळिराजाला जाते, तो उभ्या जगाचा पोशिंदा असून, त्याचा मला अभिमान आहे, असे उद्‌गार भुसे यांनी या वेळी काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com