agriculture news in marathi, Modernization of 'Kadva', will be the ethanol project | Agrowon

‘कादवा’चे आधुनिकीकरण, इथेनॉल प्रकल्प होणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

चिंचखेड, जि. नाशिक : नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, इथेनॉल प्रकल्प, टप्प्याटप्प्यात एफआरपी देणे आदी विषयांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. या वेळी उपाध्यक्ष उत्तम भालेराव, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, शिरीष कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, सुरेश डोखळे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.

चिंचखेड, जि. नाशिक : नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, इथेनॉल प्रकल्प, टप्प्याटप्प्यात एफआरपी देणे आदी विषयांना वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. या वेळी उपाध्यक्ष उत्तम भालेराव, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, शिरीष कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, सुरेश डोखळे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते.

सर्व गटांतून सर्वाधिक ऊस पुरवठा आणि विविध प्रकारांत अधिक ऊस उत्पादन करणाऱ्या ऊस उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शेटे म्हणाले, ‘‘अनेक कारखाने एफआरपी देऊ शकले नसताना, उपपदार्थांची निर्मिती नसताना सर्वाधिक भाव व वेळेत एफआरपी दिली आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे

आधुनिकीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बॉयलर, टर्बाइन व मिल टाकणे बाकी आहे. त्यानंतर २५०० मेटन क्षमतेने गाळप करणे शक्य होणार आहे. शासनाने इथेनॉल प्रकल्पाला चालना दिली असून, त्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे.

 बँक उचल देईल त्याप्रमाणे पहिला हप्ता जास्तीत जास्त देऊन उर्वरित दोन टप्प्यांत देण्याचा विचार आहे. एफआरपीमधून कोणतीही कपात केली जाणार नाही. मात्र कारखान्याला त्याव्यतिरिक्त अतिरिक्त भाव देता आला तरच भागविकास निधी कापला जाईल. कोणाचेही शेअर्स रद्द होणार नाहीत. परंतु सर्वांनी शेअर्स पूर्ण करावे. सर्व सभासदांनी ऊस लावावा, असे अवाहन शेटे यांनी केले.गाळप पुरेसे होत नसताना हे प्रकल्प हिताचे ठरणार नाहीत, असे सांगून नरेंद्र जाधव, सचिन बर्डे यांनी हरकत घेतली. गाळप वाढल्यानंतरच या प्रकल्पांचा विचार व्हावा, अशी भूमिका घेतली.

माजी संचालक जे. डी. केदार, तानाजी माळी यांनी इथेनॉल प्रकल्प शेतकरी हिताचा असल्याचे सांगून त्यास सर्वांनी साथ देण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख अरुण वाळके यांच्यासह बहुतांश सभासदांनी  इथेनॉल प्रकल्पास पाठिंबा दिला. पप्पू मोरे यांनी वेळेत ऊस तोडणी करण्याची मागणी केली.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...