कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
बातम्या
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न ः संजय राऊत
मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्य मोदींपासून लपवून का ठेवले? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. १४) केला आहे. बंद दाराआड झालेली चर्चा शहांनी मोदींपर्यंत पोहोचवलीच नाही. तसेच ज्या खोलीत ही चर्चा झाली ती खोली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. ती आम्हाला मंदिरासमान असल्याचेही राऊत म्हणाले.
मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सत्य मोदींपासून लपवून का ठेवले? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. १४) केला आहे. बंद दाराआड झालेली चर्चा शहांनी मोदींपर्यंत पोहोचवलीच नाही. तसेच ज्या खोलीत ही चर्चा झाली ती खोली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. ती आम्हाला मंदिरासमान असल्याचेही राऊत म्हणाले.
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाच्या वाटपासंदर्भात केलेल्या वक्तव्याला प्रत्यूत्तर दिले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे नाते हे भावाचे आहे. त्यात कोणतरी जाणीवपूर्वक काडी घालत असल्याचे वक्तव्य केले होते. आता संजय राऊत यांनी देखील त्याचाच पुनरुच्चार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेत कोणीतरी दरी निर्माण करत असल्याचा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, ‘‘बाळासाहेबांच्या खोलीत बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यादरम्यान जी चर्चा झाली ती पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचविण्यातच आली नाही. ही चर्चा काय होती हे आता अमित शहा यांनी उघड करावे. ही खोली बाळासाहेब वापरत असत. या खोलीत बसूनच बाळासाहेबांनी अटलजी, अडवाणी यांच्यापासून अनेकांना आशिर्वाद दिले आहेत. ही खोली साधीसुधी नाही. ती आमच्यासाठी मंदिरच आहे. तिथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेब आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही. कोणी धमक्या देत असेल तर त्यांना आम्ही भीक घालत नाही’’, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल ः नवाब मलिक
दरम्यान, महासेनाआघाडीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल, असं नवाब मलिक यांना विचारण्यात आले. त्यावर नवाब मलिक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचेच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावे. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू,’’ असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
- 1 of 920
- ››