मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट कार्ड !

मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट कार्ड !
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट कार्ड !

मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या वर्षभरात त्यांच्यासमोर असलेली आव्हाने आणि लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल जनमताचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने सर्वेक्षणाच्या माध्यमातून केला. राज्यातल्या मतदारांच्या मनात काय आहे, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ गेली काही वर्षे सातत्याने करीत आहे, त्याच प्रयत्नांचा हा एक भाग...

(सर्व आकडे टक्क्यांमध्ये)

1. निवडणुकीत मतदान करताना कोणते घटक आपल्याला महत्त्वाचे वाटतात? 

  अ) उमेदवाराची पार्श्वभूमी             37
  ब) पक्ष    26
  क) पक्षाचे नेतृत्व    23
  ड) पक्षाचा कार्यक्रम  10
  इ) जात - धर्म  1
  ई) पैसा    1
  उ) प्रादेशिक अस्मिता   1   2

2) पुढच्या निवडणुकांना सामोरे जाताना मोदी सरकार समोरील सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल?

  अ) धार्मिक व अल्पसंख्याक गटांचा विश्‍वास संपादन करणे 17
  आ) काश्‍मीर प्रश्‍न    12
  इ) विकास दर वाढवणे    25
  ई) रोजगारनिर्मितीत वाढ   35
  उ) स्वतःची प्रतिमा सुधारणे   11

3) विरोधी पक्ष प्रबळ नसणे हे भाजपच्या पथ्यावर पडते आहे का?

  अ) हो  43
  आ) नाही  27
  इ) सांगता येत नाही  30

4) राज्यात लगेच सार्वत्रिक निवडणूक झाली तर तुमची पसंती कोणत्या पक्षाला असेल.

  अ) भाजप  29
  आ) शिवसेना  23
  इ) कॉंग्रेस    27
  ई) राष्ट्रवादी कॉंग्रेस  21

5) अन्य पर्यायांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला आपली पसंती राहील?

  अ) आम आदमी पार्टी    15
  आ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना  44
  इ) डाव्या पक्षांची आघाडी  26
  ई) बसप   7
  उ) याशिवाय अन्य पक्ष   8

6) चार वर्षांपूर्वी निवडणूकांना सामोरे जाताना भाजपने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न झाले आहेत, असे आपल्याला वाटते का? 

  अ) होय     16
  आ) अगदी थोड्या प्रमाणात   42
  इ) अजिबात नाही   35
  ई) सांगता येत नाही     7

7) काळ्या पैशाला आळा घालण्यास सरकारला कितपत यश आले आहे? 

  अ) बऱ्यापैकी    16
  आ) थोड्या प्रमाणात    29
  इ) अगदी थोड्या प्रमाणात    25
  ई) अजिबात नाही    30

8) महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यशस्वी ठरले आहे, असे आपल्याला वाटते का?

  अ) होय       30
  आ) अगदी थोड्या प्रमाणात   21
  इ) अजिबात नाही     40
  ई) सांगता येत नाही   9

9) शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव, कर्जमाफी, वित्तपुरवठा आदी प्रश्‍नांकडे केंद्र सरकार पुरेशा गांभिर्याने लक्ष देत आहे, असे आपल्याला वाटते का?  

  अ) होय    31
  आ) अगदी थोड्या प्रमाणात  26
  इ) अजिबात नाही    30
  ई) सांगता येत नाही       13

10) "मेक इन इंडिया', परदेशी गुंतवणूक या सारख्या प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षांत अधिक नोकऱ्या - रोजगार निर्माण झाले, असे आपणास वाटते का? 

  अ) होय    24
  आ) अगदी थोड्या प्रमाणात  44
  इ) अजिबात नाही  26
  ई) सांगता येत नाही  6

11) गेल्या तीन वर्षांच्या काळात जातीय, सांस्कृतिक ध्रुवीकरणाला चालना मिळाली, असा आरोप केला जातो, आपण त्याच्याशी सहमत आहात का? 

  अ) होय  24
  आ) अगदी थोड्या प्रमाणात  51
  इ) अजिबात नाही  16
  ई) सांगता येत नाही    9

12) केंद्रातील खालीलपैकी कोणत्या मंत्र्याची कामगिरी उत्तम आहे असे आपणास वाटते? 

  अ) नितीन गडकरी  19
  आ) पियुष गोयल  18
  इ) राजनाथ सिंह   17
  ई) अरूण जेटली   16
  उ) सुषमा स्वराज   6
  ऊ) प्रकाश जावडेकर     19
  ऐ) राजवर्धन राठोड   5

13) रोजगारासाठी आवश्‍यक कौशल्यांच्या विकासासाठी सरकारकडून होत असलेले प्रयत्न पुरेसे आहेत का? 

  अ) पुरेसे आहेत       23
  आ) आणखी प्रयत्न करायला हवेत   42
  इ) असे प्रयत्न होत आहेत याची माहितीच नाही  34

 (सर्व आकडे टक्क्यांमध्ये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com