agriculture news in marathi, Modi the Man Behind Victory : Amit Shah | Agrowon

मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित शहा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले.

नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला असून, मोदीच आजच्या विजयाचे महानायक आहेत, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विजयानंतर सांगितले.

भाजपप्रणित लोकसभा निवडणुकीत 350 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळविला. या विजयानंतर भाजप मुख्यालयात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना मोदींची स्तुती केली.

शहा म्हणाले, की आजचा विजय हा मोदींच्या लोकप्रियतेचा आहे. भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. भाजप कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मोदींनी देशभर तुफानी दौरा केली. त्यामुळे भाजपला हे यश मिळू शकले. या विजयाचे पूर्ण श्रेय मोदींना जाते. काम करणाऱ्या पंतप्रधानांना पुन्हा पूर्ण बहुमत मिळाले आहे. 50 टक्के मते मिळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे मी सांगितले होते. त्यानुसार काम करत आज 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

मोदींची लोकप्रियता आणि भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम यांचा फायदा भाजपला झाला आहे. उत्तर प्रदेशात आम्ही सप आणि बसपला आघाडीला मात देऊन विजय मिळविला. देशात आता परिवार आणि जातीवाद कऱणाऱ्या पक्षाला स्थान नाही. ईव्हीएमबद्दल विरोधकांनी आकडतांडव केला. तिच मेहनत विरोधकांनी मते मिळविण्यासाठी केला पाहिजे होता. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, ओडिशात नवीन पटनाईक यांना विजय मिळविल्याने त्यांचे अभिनंदन करतो.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...