सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन : महसूलमंत्री थोरात

शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत डिजिटल सेवा शेतकऱ्यांना सहज व जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यांतील बदलांसह काही कायदे रद्दही करावे लागतात. ते करून आता संगणकीकृत सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
सात-बारासह फेरफारही  मिळणार आता ऑनलाइन  Modifications with seven-twelve Get it now online
सात-बारासह फेरफारही  मिळणार आता ऑनलाइन  Modifications with seven-twelve Get it now online

पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत डिजिटल सेवा शेतकऱ्यांना सहज व जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यांतील बदलांसह काही कायदे रद्दही करावे लागतात. ते करून आता संगणकीकृत सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या सेवेद्वारे शेतकऱ्यांना नवीन स्वरूपात सात-बारा करून देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्या वतीने सात-बारा सोबत फेरफार संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.  मंत्री थोरात यांच्या हस्ते महसूल दिनाचे (ता. १) औचित्य साधून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सात-बारा वितरणासह विविध डिजिटल सेवा आणि ऑनलाइन सुविधांचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. या वेळी आमदार संग्राम थोपटे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांच्यासह महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.  राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘आजपासून नागरिकांना संगणकीकृत सात-बारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सात-बारा सहज समजण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या काळात विभागातील अधिकारी व कर्मचारी याचे योगदान मोठे आहे.’’  महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव करीर म्हणाले, ‘‘महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. महसूल गोळा करण्याबरोबरच नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी काळानुरूप बदल केले पाहिजेत. ई-पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढवणार आहे.’’  या वेळी मंत्री थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणारे उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प रामदास जगताप, वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार, वरिष्ठ तांत्रिक संचालक शुभांगी राव, नगर भूमापन कक्षाचे कार्यासन अधिकारी संजय धोंगडे, नायब तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगर भूमापन कक्षाचे शिरस्तेदार शिवाजी पंडित, तलाठी शामल काकडे, अर्चना पाटणे, सचिन भैसाडे, कृष्णा पास्ते, अव्वल कारकून डॉ. गणेश देसाई व महेंद्र गंबरे या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. तर आभार प्रदर्शन ई-फेरफार समन्वयक रामदास जगताप यांनी मानले. 

ई-पीक पाहणी होणार  सात-बारा उताऱ्याच्या डिजिटल सेवांसह येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहेत. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com