Agriculture news in marathi Modifications with seven-twelve Get it now online | Page 2 ||| Agrowon

सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन : महसूलमंत्री थोरात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत डिजिटल सेवा शेतकऱ्यांना सहज व जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यांतील बदलांसह काही कायदे रद्दही करावे लागतात. ते करून आता संगणकीकृत सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत डिजिटल सेवा शेतकऱ्यांना सहज व जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यांतील बदलांसह काही कायदे रद्दही करावे लागतात. ते करून आता संगणकीकृत सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या सेवेद्वारे शेतकऱ्यांना नवीन स्वरूपात सात-बारा करून देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्या वतीने सात-बारा सोबत फेरफार संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. 

मंत्री थोरात यांच्या हस्ते महसूल दिनाचे (ता. १) औचित्य साधून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सात-बारा वितरणासह विविध डिजिटल सेवा आणि ऑनलाइन सुविधांचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. या वेळी आमदार संग्राम थोपटे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांच्यासह महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘आजपासून नागरिकांना संगणकीकृत सात-बारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सात-बारा सहज समजण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या काळात विभागातील अधिकारी व कर्मचारी याचे योगदान मोठे आहे.’’ 

महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव करीर म्हणाले, ‘‘महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. महसूल गोळा करण्याबरोबरच नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी काळानुरूप बदल केले पाहिजेत. ई-पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढवणार आहे.’’ 

या वेळी मंत्री थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणारे उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प रामदास जगताप, वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार, वरिष्ठ तांत्रिक संचालक शुभांगी राव, नगर भूमापन कक्षाचे कार्यासन अधिकारी संजय धोंगडे, नायब तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नगर भूमापन कक्षाचे शिरस्तेदार शिवाजी पंडित, तलाठी शामल काकडे, अर्चना पाटणे, सचिन भैसाडे, कृष्णा पास्ते, अव्वल कारकून डॉ. गणेश देसाई व महेंद्र गंबरे या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. तर आभार प्रदर्शन ई-फेरफार समन्वयक रामदास जगताप यांनी मानले. 

ई-पीक पाहणी होणार 
सात-बारा उताऱ्याच्या डिजिटल सेवांसह येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहेत. ई-पीक पाहणीसाठी टाटा टस्ट्रचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले. 

 


इतर बातम्या
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...