Agriculture news in Marathi Modiji, this was not expected from a person like you | Agrowon

मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

तुमच्यासारख्या दमदार धडाडीच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती, असे गुजरात राज्य खाद्यतेल आणि तेलबिया असोसिएशनने पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात येण्याच्या काळातच व्यापारी, मिलर्स, प्रक्रिया उद्योजकांवर साठा मर्यादा लावल्याने ते कमी खरेदी करतील आणि दर घसरतील. यातून आयातदार आणि निर्यातदारांना वगळून आमच्याबाबत दुजाभाव केला आहे. यामुळे आम्ही २० ते २५ वर्षे मागे फेकले जाऊ. तुमच्यासारख्या दमदार धडाडीच्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती, असे गुजरात राज्य खाद्यतेल आणि तेलबिया असोसिएशनने पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेल व तेलबियांचे स्टाॅकिस्ट, ऑइल मिलर, घाऊक व्यापारी, एक्स्ट्रॅक्टर यांच्यावर साठा मर्यादा लागू केली आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांच्या खरीप तेलबिया पिकांची आवक बाजारात होत आहे. येणाऱ्या काळात आवक आणखी वाढेल. या निर्णयामुळे तेलबियांच्या दरात मोठी घसरण होईल. त्यातच साठा मर्यादेतून आयातदार व निर्यातदार यांना वगळले. देशांतर्गत व्यापारी व आयात-निर्यातदार यांच्यात दुजाभाव का, असा प्रश्न असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी उपस्थित केला आहे. जून महिन्यातच केंद्राने खाद्यतेल आयातशुल्कात कपात केली होती. आता साठा मर्यादा लावली. देशात गरजेच्या जवळपास ६५ टक्के खाद्यतेल आयात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढलेले असल्याने देशातही तेजी आहे. पत्रात म्हटले आहे, की तेलबियांची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात आवक वाढेल. मात्र, या निर्णयामुळे स्थानिक व्यापारी, मिलर्स, प्रोसेसर्स कमी खरेदी करतील आणि दर पडतील.

निर्यातदार आणि आयातदार यांना साठा मर्यादेतून वगळले आहे. त्यांना केवळ आपल्याकडील साठ्याची केंद्राच्या पोर्टलवर माहिती द्यायची आहे. आणि आमच्यावर साठा मर्यादा घातली आहे. आम्ही या दुजाभावाचा विरोध करतो. या निर्णयाने सरकारच्याच तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या मिशनला धोका निर्माण होईल. सरकारने पेट्रोलियम पदार्थांप्रमाणेच खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा अट्टहास करू नये. खाद्यतेलाच्या वाढत्या दराचा सामना करण्यासाठी ग्राहकांना विवेकाने वापर करण्यास सांगावे. कुटुंबाने असे पॅकिंग केलेले पदार्थ थोडे जरी कमी वापरले तरी बजेट कोलमडणार नाही. 
- समीर शहा, अध्यक्ष, खाद्यतेल आणि तेलबिया असोसिएशन


इतर अॅग्रोमनी
सोयाबीनः सावध, ऐका पुढल्या हाका जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
कापूस वायदा सरकारी रडारवरदेशात ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत एकंदर नऊ कृषी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
cotton market: पांढरं सोनं उद्योगाच्या... पुणे ः कापसाचे दर वाढल्याची हाकाटी पिटत कापड...
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १...देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट...
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडेनागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
साखर उत्पादनाची शतकी मजलकोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू...
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवरकमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे -...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
देशातील तूर उत्पादनात मोठी घटपुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग,...
खर्चात बचत हाच नफ्याचा पायानांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा...
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...