सभा मोदींची; प्रशासनाने घेतली शेतकऱ्यांची धास्ती

सभा मोदींची; प्रशासनाने घेतली शेतकऱ्यांची धास्ती
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली शेतकऱ्यांची धास्ती

नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन मतदारसंघाच्या अनुषंगाने ही सभा घेण्यात येत आहे. मात्र, सरकारवर रोष असलेल्या शेतकऱ्यांची धास्ती प्रशासनाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

सभेच्या ठिकाणी श्रोत्यांकडून कुठलाही शेतमाल आणला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत. या संदर्भात गृहविभागाच्या पत्रात मोदी यांच्या सभेत ‘शेतकरी गोंधळ घालण्याची शक्यता’ अधोरेखित करीत असून, त्यामुळे प्रशासन व पोलिस यंत्रणा प्रचंड धास्तावली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांपासून गुप्तचर यंत्रणा प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष असले तरी शेतकऱ्यांची धास्ती यंत्रणेला आहे.

कांदा, टोमॅटो, द्राक्ष व बेदाण्याची मुख्य बाजारपेठ पिंपळगाव बसवंत येथे आहे. शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संपप्त वातावरण आहे. त्यामुळे या सभेत शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता नाकारता प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या काही वर्षांत शेतकरी वेळोवेळी सरकारच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरला होता. अशातच स्वतः पंतप्रधानच जिल्ह्यात येत असल्याने शेतकरी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना, भाजप आमदार व नेते यांचे याठिकाणी नियोजनात विशेष लक्ष घातले आहे. 

प्रशासनाकडून ही विशेष काळजी २०१४ साली झालेल्या सभेत सभेचे ठिकाण तीनदा बदलले होते. या सभेत काळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची बारीकसारीक तपासणी करूनच सभेला प्रवेश देण्यात येणार आहे. मोदींची सभा होत असलेल्या ठिकाणी ऐनवेळी आंदोलकांची घुसखोरी टाळण्यासाठी मैदानाच्या चारही बाजूंनी सुमारे ६ फुटांहून अधिक खोलीचे खंदक खोदण्याचे काम सुरू झाले आहे. चारही बाजूंनी मोठा खंदक खोदून बॅरिकेडिंग केले जात आहे. या कामासाठी येणाऱ्या मजुरांचीही लेखी नोंद घेतली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com